
परदेशातून MBBS साठी NEET-UG उत्तीर्ण होणे अनिवार्य! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
नवी दिल्ली : प्रतिनिधी लाखो भारतीय विद्यार्थी दरवर्षी ‘नीट’ची परीक्षा देऊन ‘एमबीबीएस’ला प्रवेश मिळवतात. काही विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जातात. अशा भारतीय विद्यार्थ्यांना कोणत्याही परदेशी संस्थेतून ‘एमबीबीएस’ करण्यासाठी ‘नीट-युजी’ परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. ‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय तो विद्यार्थी परदेशी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकणार नाही. एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय