
मराठा आरक्षण : राज्य, केंद्रावर प्रणिती शिंदेंची लोकसभेत टीका
khabarbat News Network नवी दिल्ली I गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगे पाटलांनी मराठा आंदोलनासाठी उपोषण छेडले. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं याकरता मनोज जरांगे यांनी मागणी लावून धरली. दरम्यान, काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनीही मराठा आरक्षणाचा विषय आज लोकसभेत मांडला. खासदार झाल्यानंतर आज त्यांनी पहिल्यांदाच लोकसभेत भाषण केलं. त्यामुळे त्यांच्या पहिल्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष