
अमेरिकेचा पाय खोलात, आयसीसीकडून मोठ्या हालचाली, बंदी येणार?
वॉशिंग्टन I अमेरिकेने नुकत्याच पार पडलेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये सुपर ८ मध्ये धडक दिली होती. आयसीसीने आता अमेरिका क्रिकेट बोर्डाला एक नोटीस दिली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. टी-२० वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करणा-या अमेरिका संघावर बंदीचे सावट आहे. आयसीसीने अमेरिका क्रिकेट बोर्डाला नोटीस जारी केली आहे. कोलंबोमध्ये झालेल्या बैठकीनंतर ही नोटीस जारी करण्यात आली.