
insect brain controller | चीनने चक्क मधमाशीलाच बनविले हेर!
बीजिंग : News Network चीनने नुकतेच एक असे तंत्रज्ञान विकसित केले आहे, ज्याने जगातील मोठ्या देशांची झोप उडवली आहे. ड्रॅगनने आता अशा मधमाश्या तयार केल्या आहेत, ज्या त्याच्या इशा-यावर काम करतील आणि शत्रूंची गुप्त माहिती सैन्यापर्यंत पोहोचवतील. बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक झाओ जेलियांग आणि त्यांच्या टीमने जगातील पहिले ‘कीटक मेंदू नियंत्रक’ तयार केले आहे.