विजय मल्ल्याच्या मुलाखतीचा संपादित अंश
नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी
मी पळपुटा नाही. तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींना सांगून देश सोडला, मला चोर म्हणणे चुकीचे आहे, कारण ६,२०० कोटींच्या बदल्यात बँकांनी १४,००० कोटी वसुल केलेत, असा दावा विजय मल्ल्या याने केला आहे. बँकांसोबत सेटलमेंट करण्याचा विचार करत असतानाच पासपोर्ट रद्द झाला आणि परदेशात अडकल्याचेही त्याने सांगितले. यूट्यूबर राज शमानी याच्यासोबत पॉडकास्टमधून ही माहिती समोर आली आहे.

विजय माल्या एकेकाळी भारतात यश, वैभव आणि लक्झरीचे प्रतीक मानले जात होते, आज ६२०० कोटी रुपयांच्या बँक कर्ज फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ते अडकले आहेत.

…तर भारतात परतण्याचा विचार : सध्या माल्या लंडनमध्ये आपल्या सहा कुत्र्यांसोबत वेळ घालवतात. त्यांचे उत्पन्न विदेशी दारू कंपन्यांमधून येते. ते म्हणतात, मी कायदेशीर लढा देत आहे. जर मला न्याय्य सुनावणी मिळाली, तर भारतात परतण्याचा विचार करेन. तुरुंगात जाणे माझ्या नशिबात असेल, तर त्याचाही सामना करेन.
प्रणब मुखर्जी यांची घेतली भेट : किंगफिशर एअरलाइन्सच्या आर्थिक अडचणी जागतिक अर्थव्यवस्था ढासळल्यानंतर वाढत गेल्या. माल्या म्हणाले, तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. मी प्रणव मुखर्जी यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितले की, Kingfisher Airlines चे ऑपरेशन्स कमी करावे लागतील, काही विमाने बंद करावी लागतील आणि कर्मचा-यांना कमी करावे लागेल. कारण मला एवढे खर्च परवडणार नाहीत. मात्र हा प्रस्ताव नाकारण्यात आला. मला सांगण्यात आले की, ऑपरेशन कमी करू नका. तुम्ही काम सुरूच ठेवा, बँका तुम्हाला सहकार्य करतील.
बँकांनी दीडपट वसुली केली : माल्यांनी १७ बँकांकडून एकूण ६२०३ कोटींचे कर्ज घेतले. मात्र त्यांचा दावा आहे की बँकांनी त्यांच्या संपत्तीतून १४१३१.६ कोटी रुपये वसूल केले. म्हणजे मूळ कर्जाच्या दीडपटपेक्षा जास्त. मी २०१२ ते २०१५ या काळात चार वेळा सेटलमेंट ऑफर दिल्या, त्यात ५००० कोटींचा प्रस्तावही होता. पण बँकांनी नाकारले. सध्या कर्नाटक उच्च न्यायालयाकडे वसुलीचा हिशेब मागत आहेत.
९०० कोटींचे कर्ज फेडल्याचा दावा : CBI ने त्यांच्यावर ब्रँड व्हॅल्युएशन आणि खासगी जेटच्या गैरवापराचे आरोप केले, माल्या यांनी नाकारले. ED ने त्यांच्यावर ३५४७ कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंगचे आरोप लावले, पण ते म्हणतात, एअरलाइन्सच्या ५०% खर्चासाठी विदेशी चलन वापरणे मनी लॉन्ड्रिंग नाही.त्यांनी कऊइक बँकेचे ९०० कोटींचे कर्ज फेडल्याचेही सांगितले.
मला चोर म्हणू नका…
माल्या २ मार्च २०१६ रोजी जिनिव्हामधील ऋकअ मिटिंगसाठी लंडनला गेले. ते म्हणाले, ‘‘मी अरुण जेटलींना सांगितले होते की मी जात आहे आणि सेटलमेंटची चर्चा करणार आहे. पण पासपोर्ट रद्द झाल्यामुळे अडकलो. मी भगोड़ा नाही. ही काही पळून जाण्याची योजना नव्हती. मला चोर म्हणणे चुकीचे आहे. माझी ओळख एक कष्टाळू उद्योगपती म्हणून व्हावी, जो १.७५ लाख कोटी रुपयांची बाजारपेठ निर्माण करू शकतो झ्र चोर म्हणून नव्हे. किंगफिशर अपयशी ठरली, पण मी माझ्यापरीने संपूर्ण प्रयत्न केला. भारतात व्यवसाय फसला की फसवणूक ठरवले जाते.