
Hair Fall in Buldana | गव्हातील ‘सेलेनियम’मुळे बुलढाण्यात केस गळती!
बुलढाणा : प्रतिनिधी बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातल्या जवळपास १५ गावांत महिनाभरापासून केसगळतीची समस्या भेडसावत आहे. अनेक दिवसांपासून याचे कारण समोर येत नव्हते. पण नुकत्याच आलेल्या अहवालानुसार रुग्णांच्या रक्तातील आणि केसात सेलेनियम या जड धातूचे प्रमाण हे याचे प्रमुख कारण असल्याचे कळते. हे सेलेनियम इथले नागरिक जो गहू वापरतात त्यातून त्यांच्या शरीरात भिनल्याचा अंदाज लावला जात आहे.