
India Budget 2025 | अर्थव्यवस्थेत ६.७ टक्के दराने वाढ अपेक्षित; आगामी बजेटची तयारी सुरू
नवी दिल्ली : khabarbat News Network केंद्र सरकार लवकरच पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. आर्थिक व्यवहार विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, वित्त मंत्रालय ऑक्टोबरच्या दुस-या आठवड्यापासून २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया सुरू करेल. भारतीय अर्थव्यवस्थेने सलग चार आर्थिक वर्षांत सात टक्के किंवा त्याहून अधिक वाढ नोंदवली आहे. The