हैदराबाद : विशेष प्रतिनिधी
Telangana MLA’s Secret Meeting | काँग्रेसची स्वबळावर सत्ता असलेल्या तेलंगाणामध्ये पक्षात अंतर्गत धुसफूस सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. पक्षाच्या १० आमदारांनी बंद खोलीमध्ये बैठक घेतली आहे. त्यामुळे पक्षनेतृत्वासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. तसे पक्षातील आमदारांमध्ये वाढत असलेला असंतोष शमविण्यासाठी मुख्यमंत्री (CM Revant Reddy) रेवंत रेड्डी हे सरकारमधील सर्व मंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. दरम्यान, पक्षातील काही आमदार हे मंत्री पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांच्याबाबत नाराज असल्याचे सांगितले जात आहे. (Telangana Latest News)

या पार्श्वभूमीवर मंत्री पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांनी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत सहभाग घेण्यासाठी आपला दौरा रद्द केला आहे. मुख्यमंत्री (CM Reddy) रेड्डी यांनी अधिका-यांना या बैठकीत सहभागी न होण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पक्षामधील असंतोष अधिकच गंभीर पातळीवर पोहोचल्याचे बोलले जात आहे. या नाराजीमुळे आगामी विधान परिषद निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनतेमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो, अशी चिंता पक्ष नेतृत्वाला लागली आहे.
या बैठकीत सहभागी झालेल्या आमदारांमध्ये नैनी राजेंदर रेड्डी, भूपती रेड्डी, येनम श्रीनिवास रेड्डी, मुरली नाईक, कुचुकुल्ला राजेश रेड्डी, संजीव रेड्डी, अनिरुद्ध रेड्डी, लक्ष्मीकांत, दोंती माधव रेड्डी आणि बीरला इलैय्या यांचा समावेश होता. काँग्रेसच्या काही आमदारांच्या गुप्त बैठकीनंतर अंतर्कलहाच्या चर्चा लपवण्याचा प्रयत्न करताना नागरकर्नूलचे खासदार मल्लू रवी यांनी सांगितले की, ही केवळ डिनर मिटिंग होती. विरोधी पक्षांनी विनाकारण हे प्रकरण वाढवण्याचा प्रयत्न केला, असा दावाही त्यांनी केला. (telengana news alert)