
Marvel : गुन्हेगारी मोडून काढणार महाराष्ट्र पोलिसांचे ‘मार्वल’ अस्त्र !
khabarbat News Network नागपूर : पोलीस दलाला ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’ (AI) ची जोड मिळाल्याने मशीनद्वारे माहितीचे विश्लेषण करून आणि मानवाप्रमाणे विचार करायला शिकवून गुन्ह्यांची उकल करण्यासाठी तसेच होणारे गुन्हे रोखण्यासाठी मोठा लाभ होऊ शकेल. त्यासाठीच महाराष्ट्र पोलिसांकडे AI चे ‘मार्वल’ हे अस्त्र देण्यात आल्याची माहिती नागपूर जिल्हा पोलीस अधिक्षक हर्ष पोतदार यांनी दिली. भारतीय व्यवस्थापन संस्था