khabarbat News Network

संभाजीनगर : उद्याच्या सर्वपक्षीय बैठकीत आरक्षणाच्या संदर्भात सर्वमान्य तोडगा काढा, मी आज तुम्हाला जाहीर पाठिंबा देतो असेही उद्धव ठाकरे म्हणाले. मनोज जरांगे पाटलांना बोलवा, लक्ष्मण हाकेंना बोलवा. त्यांना सांगा खरच आरक्षण मिळते का? त्यांच्या जीवाशी का खेळता? असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आरक्षणाच्या संदर्भातील टक्केवारी वाढवण्यासाठी विधानसभेत ठराव करा. शिवसेना तुम्हाला आज पाठिंबा देत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. संभाजीनगरसह कोकणातील पराभव माझ्या जिव्हारी लागल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
संभाजीनगरचा खासदार आमचा नाही याचे शल्य आमच्या मनात असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. आपली हक्काची जागा गमवावी लागली याचे शल्य आहे. निष्ठेचा आदर करुन मी चंद्रकांत खैरे यांनी उमेदवारी दिली होती असे ठाकरे म्हणाले. याठिकाणची निवडणूक हरलो तरी पुन्हा जिंकू या इराद्याने मी इथे आलो असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.