khabarbat

Maharashtra government has decided to establish a special purpose vehicle for the use of AI in the Maharashtra Police Force and get the help of this artificial intelligence to the police force. Accordingly, Maharashtra Research and Vigilance for Enhanced Law Enforcement (MARVEL) was established.

Advertisement

Marvel : गुन्हेगारी मोडून काढणार महाराष्ट्र पोलिसांचे ‘मार्वल’ अस्त्र !

khabarbat News Network
नागपूर : पोलीस दलाला ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’ (AI) ची जोड मिळाल्याने मशीनद्वारे माहितीचे विश्लेषण करून आणि मानवाप्रमाणे विचार करायला शिकवून गुन्ह्यांची उकल करण्यासाठी तसेच होणारे गुन्हे रोखण्यासाठी मोठा लाभ होऊ शकेल. त्यासाठीच महाराष्ट्र पोलिसांकडे AI चे ‘मार्वल’ हे अस्त्र देण्यात आल्याची माहिती नागपूर जिल्हा पोलीस अधिक्षक हर्ष पोतदार यांनी दिली.

भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) नागपूरमध्ये दोन दिवसापासून विश्वमंथन रिसर्च फाउंडेशनतर्फे ‘एआय’वर मंथन सुरू आहे. शनिवारी त्याअंतर्गत आयोजित एका पॅनल चर्चेत हर्ष पोतदार व साई क्रिष्णा हे सहभागी होते.

The state government has decided to establish a special purpose vehicle for the use of AI in the Maharashtra Police Force and get the help of this artificial intelligence to the police force. Accordingly, Maharashtra Research and Vigilance for Enhanced Law Enforcement (MARVEL) was established.

हर्ष पोतदार यांनी सांगितले, पोलीस दलाकडे गुन्हे आणि गुन्हेगारांसंबंधी माहिती मोठ्या प्रमाणावर येत असते. सायबर आणि आर्थिक स्वरुपाच्या गुन्ह्यांच्या संख्येतही मोठी वाढ होत असून नागरिकांच्या फसवणुकीचे नवनवीन मार्ग अवलंबिले जात आहेत. यात गुन्ह्यांचे प्रकार आणि गुन्हेगारांची संख्या देखील मोठी असते.

प्रत्येक बाबीत विविध प्रकारे मानवी मेंदूच्या क्षमतेचा वापर करून आणि उपलब्ध माहितीचे विश्लेषण करून गुन्ह्यांची उकल करण्याचा प्रयत्न केला जातो. तथापि या माहितीचा वापर करून विश्लेषण करायला आणि मनुष्याप्रमाणे निर्णय घ्यायला आधुनिक संगणकालाच शिकविले तर याचा मोठा लाभ होऊ शकतो.

महाराष्ट्र पोलीस दलात एआयचा वापर करण्यासाठी स्पेशल पर्पज व्हेईकल स्थापन करुन पोलीस दलाला या कृत्रिम बुद्धीमत्तेची मदत मिळवून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्या अनुषंगाने महाराष्ट्र रिसर्च अ‍ॅण्ड व्हिजिलन्स फॉर एनहान्स्ड लॉ एनफोर्समेंट (Marvele) ची स्थापना करण्यात आली.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »