Gujrat Flood | विकास कामे, सांडपाणी नियोजनात तडजोडीमुळे गुजरातमध्ये पूरस्थिती
khabarbat News Network अहमदाबाद | तीव्र हवामान आणि व्यापक प्रमाणात करण्यात आलेल्या शहरीकरणामुळे गुजरातमध्ये पूरस्थिती निर्माण झाली, असा दावा भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) गांधीनगरमधील अभ्यासकांनी केला आहे. गुजरातमध्ये २० ते २९ ऑगस्ट दरम्यान मुसळधार पाऊस झाला. राज्यातील एकूण ३३ जिल्ह्यांपैकी १५ जिल्ह्यांत या कालावधीत मागील १० वर्षांतील सरासरी पावसापेक्षा अवघ्या तीन दिवसांत अधिक पाऊस झाल्याचे