The shocking fact that two persons from Sambhajinagar city are involved racket called Digital Arrest has been revealed in the investigation of the Tamil Nadu Police.

Digital Arrest प्रकरणात संभाजीनगरचे दोन अभियंते जेरबंद

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी देशभरात चर्चेत असलेल्या Digital arrest या सायबर क्राइमच्या राष्ट्रीय रॅकेटमध्ये संभाजीनगर शहरातील दोन मुले सहभागी असल्याची धक्कादायक बाब तामिळनाडू पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. श्रीकांत सुरेशराव गाडेकर (रा. वडगाव कोल्हाटी, छत्रपती संभाजीनगर), नरेश कल्याणराव शिंदे (रा. आर्यन सिटी, तिसगाव चौफुली, वाळूज) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही अभियंते असून गेल्या अनेक दिवसांपासून…

IBPS Recruitment

IBPS recruitment | बँकांमध्ये क्लर्क पदाच्या १० हजारांहून अधिक रिक्त जागांसाठी भरती

देशभरातील बँकांमध्ये क्लर्क पदाच्या १० हजारांहून अधिक रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. १ ऑगस्ट पासून IBPS च्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर या नवीन भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यंदा IBPS द्वारे विविध राज्यांमधील १०२७७ पदे भरली जाणार आहेत. यात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातसाठी सर्वाधिक पदे आहेत. ऑनलाइन नोंदणी १ ऑगस्ट २०२५ ते…

A nationwide boycott has been announced against two giant American companies, Walmart and McDonald's.

Boycott on MacDonald, Walmart | मॅकडोनाल्ड्स, वॉलमार्टवर अमेरिकी जनतेचा बहिष्कार

Boycott on MacDonald, Walmart | वॉशिंग्टन : अमेरिकेतील दोन महाकाय कंपन्या वॉलमार्ट आणि मॅकडोनाल्ड्स यांच्याविरोधात देशव्यापी बहिष्काराची घोषणा करण्यात आली आहे. ‘द पीपल्स युनियन यूएसए’ या पुरोगामी गटाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन १ ऑगस्टपासून सुरू झाले असून, संपूर्ण महिनाभर चालणार आहे. कंपन्यांकडून होणारे कामगारांचे शोषण, करचुकवेगिरी आणि सामाजिक जबाबदारीचा अभाव या मुद्द्यांवरून अमेरिकन नागरिकांना या कंपन्यांवर…

On Friday, the Sensex fell by 650 points and the Nifty by more than 200 points. Due to this decline, investors lost a whopping Rs 5.27 lakh crore in market cap in a single day.

Black Friday in stock market | गुंतवणूकदारांचे ५.२७ लाख कोटी पाण्यात; बॅँकिंग क्षेत्राला सर्वाधिक फटका

मुंबई : News Network आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. शुक्रवारी सेन्सेक्स ६५० अंकांनी आणि निफ्टी २०० हून अधिक अंकांनी घसरला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल ५.२७ लाख कोटींचे मार्केट कॅप एका दिवसात कमी झाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन टॅरिफ ऑर्डरमुळे हा सर्वात मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. –…

The new tariffs could cost an average American family about Rs 2 lakh annually.

Trump Tariff effect : अमेरिकी अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार!

  Trump Tariff effect | नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर लावलेल्या नव्या टॅरिफमुळे अमेरिकन कुटुंबाला दरवर्षी सरासरी सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागू शकते, असा इशारा येल विद्यापीठातील द बजेट लॅब या संस्थेचे अर्थशास्त्र विभागाचे संचालक एर्नी टेडेस्ची यांनी आपल्या ‘स्टेट ऑफ यूएस टॅरिफ्स : ३० जुलै २०२५’…

Queensland's newly elected Labor Party Senator Corinne Mulholland delivered her first speech in Parliament while holding her infant son Auggie.

Corinne Mulholland | तान्हुल्याला कडेवर घेऊन ऑस्ट्रेलियाच्या खासदाराचे संसदेत भाषण

क्विन्सलॅँड : News Network ऑस्ट्रेलियाच्या संसदेत एक खुप सुंदर क्षण पाहता आला. क्विन्सलँडची लेबर पार्टी नवनिवार्चित सिनेटर कोरिन मुलहॉलँड (Corinne Mulholland) यांनी आपले पहिले संसदेतले भाषण आपल्या तान्हुल्या ऑगी या मुलास कडेवर घेऊन केले आहे. हा क्षण केवळ भावनात्मक नव्हता तर एक सशक्त संदेश देखील दिला. त्या म्हणाल्या की, खासदार केवळ लोकप्रतिनिधी नसतात तर एक…

Famous auto company Bajaj Auto may have to stop production of its electric vehicles from August 2025.

Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन

  संभाजीनगर (औरंगाबाद) : प्रतिनिधी प्रसिद्ध ऑटो कंपनी बजाज ऑटोला मोठा धक्का बसू शकतो. कंपनीचे MD राजीव बजाज यांनी सांगितले की, परिस्थिती सुधारली नाही, तर कंपनीला ऑगस्ट २०२५ पासून त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन थांबवावे लागू शकते. Bajaj सध्या त्यांचे चेतक इलेक्ट्रिक स्कूटर आणि अलीकडेच लॉन्च झालेल्या गो ई-रिक्षाचे उत्पादन करत आहे. परंतु आता चीनमधून हे…

An angry boyfriend brutally murdered his girlfriend by hitting her head on a stone after demanding money and threatening to file a false rape case.

गर्लफ्रेंडच्या धमकीने प्रियकर संतापला; दगडावर आपटून तिचा खून केला

दौलताबाद (संभाजीनगर) : प्रतिनिधी boyfriend brutally murdered girlfriend | पैशाची मागणी आणि खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने संतप्त प्रियकराने प्रेयसीचा डोकं दगडावर आपटून निर्घृण खून केला. मृतदेह दौलताबाद घाटात फेकून आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला. गुरुवारी (२४ जुलै) रात्री ही थरकाप उडवणारी घटना घडली असून, शुक्रवारी सकाळी हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला….

Thousands of Indians working in the US on H-1B visas are likely to lose their jobs after Trump's warning.

Indians could lose jobs in america | ट्रम्पच्या इशा-याचा भारतीय तंत्रज्ञ, IT उद्योगाला फटका शक्य

वॉशिंग्टन : News Network Indians could lose jobs in america | भारतातील हजारो लोक सध्या अमेरिकेत नोकरी करत आहेत. यातील बहुतेक लोक हे आयटी क्षेत्राशी निगडीत आहेत. ट्रम्प यांच्या इशा-यानंतर एच-१ बी व्हिसाद्वारे अमेरिकेत काम करणा-या हजारो भारतीयांच्या नोक-या जाण्याची शक्यता आहे. दरवर्षी हजारो भारतीय तरुण अमेरिकेत नोकरीसाठी जातात. मात्र आता ट्रम्प यांच्या निर्णयामुळे हजारो…

Hundreds of students are studying Marathi language at Aligarh University. They have chosen Marathi courses in view of employment opportunities in Maharashtra.

Marathi courses at Aligarh University | महाराष्ट्रातील नोक-यांसाठी युपी-बिहारींचा मराठीवर भर

अलिगढ : News Network Marathi courses at Aligarh University | उत्तर प्रदेशातील अलिगढ विद्यापीठात शेकडो विद्यार्थी मराठी भाषा शिकत असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रातील रोजगाराच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांनी मराठी विषयाचा अभ्यासक्रम निवडला आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या भाषा वादात उत्तर भारतीयांवर होणा-या हल्ल्यांमुळे एक नवीन वाद सुरू झाला आहे. मराठी भाषा न येणा-यांना मारहाण केली जात…