कॅनडातील टोरंटोमध्ये महापौरपदाची निवडणूक होणार असून यावेळी १०२ उमेदवारांमध्ये एका कुत्र्याच्या नावाचाही समावेश आहे. सात वर्षांची मॉली आणि तिचे मालक टॉप्सी हीप्स, स्टॉप द सॉल्ट अॅसॉल्ट असे वचन देऊन मैदानात उतरले आहेत. हिवाळ्यामध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात मीठ वापरल्याने कुत्र्यांसह इतर प्राण्यांच्या पायाचे नुकसान होते, असा हिप्सचा दावा आहे.
त्यांच्या या मोहिमेमध्ये परवडणारी घरे, मोठ्या व्यवसायांवर वाढीव कर आणि घरे आणि कार्यालयांसाठी जीवाश्म इंधन हीटिंग सिस्टमवर बंदी घालण्याचे आश्वासन देखील समाविष्ट आहे. जर तो जिंकला तर तो मॉलीला पहिला ‘ऑनररी डॉग मेयर’ बनवेल. असे हिप्स यांनी सांगितले. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, मला वाटते की तिथे एखादा प्राणी असेल तर सिटी हॉल अधिक चांगला निर्णय घेईल.