लंडन : News Network
smart toothbrush : युनायटेड किंग्डममधील एका महिलेने नव-याच्या स्मार्ट टूथब्रशच्या सहाय्याने नव-याचं विवाहबा संबंध (extramarital affair) असल्याचे पुराव्यासकट समोर आणले आहे. या स्मार्ट ब्रशच्या डेटाच्या माध्यमातून तिने नव-याची पोलखोल केली आहे. दातांच्या संदर्भातील स्वच्छतेसाठी वापरल्या जाणा-या App च्या माध्यमातून एका पत्नीने कशाप्रकारे स्मार्ट ब्रशमधील डेटा वापरुन नव-याला रंगेहाथ पकडलं याबद्दल खासगी गुप्तहेर पॉल जॉन्सने संपूर्ण किस्सा सांगितला.


या विवाहित महिलेला दोन मुलं आहेत. मुलं नियमितपणे दात घासतात की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी ही महिला अॅप्लिकेशनच्या माध्यमातून लक्ष ठेवायची. मात्र एकदा हा डेटा तपासताना तिला मुलांचे टूथब्रश मुलं शाळेत असतानाही वापरले जात असल्याचे दिसून आले. दर शुक्रवारी सकाळी ९ वाजता ऑफिसला जात असेल आणि तिचा ब्रश १० वाजून ४८ मिनिटांनी वापरला जात असेल तर शंका येणं साहजिक होतं.
आता हा ब्रश नेमका कोण वापरतं हे तपासून पाहण्याआधी या महिलेने आधी मुलांच्या शाळेत चौकशी केली. हजेरीपट तपासून पाहिला असता मुलं शाळेतच होती असं स्पष्ट झालं. त्यानंतर तिने तिचा मोर्चा नव-याकडे वळवला. नव-याने आपण कायम या वेळी ऑफिसलाच असतो असं सांगितलं. मात्र डिजीटल डेटा वेगळीच माहिती देत होता. या महिलेने गुप्तहेराच्या मदतीने तपास केला असता तिला असं दिसून आलं की टूथब्रशचा कनेक्शन App सोबत तसंच राहिलं आणि सगळा data पतीची पोलखोल करत राहीला. तिला नवरा ऑफिसला जातोय असं सांगून त्याच्या प्रेयसीला त्यांच्याच घरात भेटायचा. दर शुक्रवारी तो प्रेयसीला घरी आणून तिच्यासोबत वेळ घालवायचा.