नवी दिल्ली : khabarbat News Network
विकसित देशांच्या तुलनेत भारताचा शिक्षणावरील खर्च तुलनेत सर्वात कमी आहे. भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयईआय) मते भारताने शिक्षणावरील खर्च जीडीपीच्या ६ टक्के करणे आवश्यक आहे.

अहवालात काही वर्षांत भारतात शिक्षणावर ३ टक्केपेक्षा कमी गुंतवणूक केल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. सहा वर्षांत भारताचा शिक्षणावरील खर्च जीडीपीच्या २.७ टक्के आणि २.९ टक्के या दरम्यान राहिला आहे. त्यामुळे भारताने शिक्षणावरील गुंतवणूक तत्काळ वाढविण्याची गरज अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
जगातील विकसित अर्थव्यवस्था मात्र जीडीपीच्या पाच ते सात टक्के शिक्षणावर खर्च करत आहे. अनेक देशांत प्राथमिक शिक्षण भक्कम आहे. माध्यमिक शिक्षणावर थोडी अधिक मेहनत बाकी आहे. त्याचवेळी भारतात मात्र माध्यमिक शिक्षणावर मात्र अधिक मेहनत घेण्याची गरज आहे.
शिक्षणावरील खर्चाचे प्रमाण
स्विडन ६.९०%
ऑस्ट्रेलिया ५.५०%
ब्रिटन ५.५०%
अमेरिका ५.००%
चीन ४.१०%
थायलंड ४.००%
इंडोनेशिया ३.७०%
भारत २.७०%