khabarbat

Advertisement

संजय शिरसाट यांचे पारडे जड, तरीही ‘पेपर हार्ड’!

संभाजीनगर पश्चिम मतदारसंघ। ग्राऊंड रिपोर्ट

संभाजीनगर | khabarbat News Network

छत्रपती संभाजीनगर (पश्चिम) या मतदारसंघामध्ये कायमच शिवसेनेचं वर्चस्व राहिलं आहे. सध्या या मतदारसंघातून संजय शिरसाट हे विद्यमान आमदार आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी देखील पुन्हा एकदा संजय शिरसाट हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता ही निवडणूक निश्चितपणे संजय शिरसाट यांच्यासाठी सोपी नसणार आहे.

हे देखील वाचा : … तर लाडक्या बहिणी लाटण्याने मारतील! असं छगन भुजबळ का म्हणाले?

या मतदारसंघात महाविकास आघाडीने देखील मोठा डाव खेळला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून राजू शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे या मतदारसंघातील मतदार आता कोणाच्या बाजूने कौल देणार शिवसेना शिंदे की शिवसेना ठाकरे गट हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हे देखील वाचा… मॉडर्न नात्यातील नवी टर्म ‘शुगर डॅडी’!

दोन्ही उमेदवारांची तुलना केल्यास संजय शिरसाट यांचे पारडे या मतदारसंघातून सध्या तरी जड वाटत आहे. कारण ते सलग तिनवेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. २००९, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत या मतदारसंघातून संजय शिरसाट विजयी झाले आहेत. २०१४ च्या निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला होता.

यावेळी संजय शिरसाट चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दुसरीकडे राजू शिंदे हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत, त्यांची देखील स्थानिक राजकारणावर चांगली पकड आहे. मात्र शिरसाट यांच्या तुलनेत अनुभवाची कमतरता दिसून येत आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटाला मिळणा-या सहानुभुतीचा फायदा त्यांना या मतदारसंघात होऊ शकतो. तथापि, या मतदारसंघातील पेपर संजय शिरसाट यांच्यासाठी आव्हानात्मक असला तरी प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ते कशा पद्धतीने समीकरणांची जुळवाजुळव करतात यावरच या परिक्षेतील त्यांचे यशापयश अवलंबून राहणार आहे.

हे देखील वाचा… स्वत:चा घाम विका, करोडपती बना… वाचा आगळा-वेगळा बिझनेस कोणी सुरू केलाय!

छत्रपती संभाजीनगर पश्चिम हा मतदारसंघ शहरी मतदारसंघ आहे. मात्र या मतदारसंघात अनेक ग्रामीण भागांचा देखील समावेश होतो. ग्रामीण भागांमध्ये शिवसेना ठाकरे गटाची पकड अधिक मजबूत दिसते. ही बाब देखील राजू शिंदे यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकते. या मतदारसंघात एकूण २,८७,४६८ एवढं मतदान आहे, त्यापैकी पुरुषांची संख्या ही १,५४,४३१ एवढी आहे तर महिला मतदारांची संख्या १,३३,०३६ एवढी आहे.

– श्रीपाद सबनीस 

s4shripad@gmail.com

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »