Legendary tennis player Rafael Nadal will retire from the tennis court after next month’s Davis Cup final. The Spaniard has struggled with injuries in recent years and hinted at retirement in 2023.
सिडनी : News Network
दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल पुढील महिन्यात होणा-या डेव्हिस कप फायनलनंतर टेनिस कोर्टवरून निवृत्ती घेणार आहे. स्पॅनियार्ड गेल्या काही वर्षांत दुखापतींशी झुंजत आहे आणि २०२३ मध्ये त्याने निवृत्तीचे संकेत दिले होते. आज त्याने तशी घोषणा केली.
३८ वर्षीय राफेलने कारकीर्दित २२ ग्रँडस्लॅम जेतेपदं नावावर केले आहेत. राफेलने २००९ व २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली. त्याने फ्रेंच ओपन स्पर्धेची सर्वोत्तम १४ जेतेपदे नावावर केली आहेत. विम्बल्डनची( २००८ व २०१०) दोन आणि अमेरिकन ओपन (२०१०, २०१३, २०१७ व २०१९) चार जेतेपदं त्याने जिंकली आहेत.
राफेल नदाल, रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोव्हिच या तीन दिग्गजांचा खेळ पाहून टेनिसच्या प्रेमात पडलेल्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का आहे. २००८च्या विम्बल्डन फायनलमध्ये फेडररला पराभूत करून तो चर्चेत आला आणि त्यावेळी त्याने जागतिक क्रमवारीत नंबर वन स्थानही पटकावले.
– सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणा-या खेळाडूंमध्ये राफेल नदाल दुस-या स्थानावर आहे.
– टेनिसच्या इतिहासात सर्वाधिक जेतेपदे जिंकणा-या खेळाडूंमध्येही राफेल नदाल दुस-या स्थानावर आहे.
– एटीपी रॅँकिंगमध्ये राफेल नदाल ९१२ आठवडे टॉप टेनमध्ये होता.
– लाल मातीत त्याने सर्वाधिक ६३ जेतेपदे जिंकली आहेत आणि त्यात १४ फ्रेंच ओपन स्पर्धेच्या जेतेपदांचा समावेश आहे.