khabarbat

khabarbat logo

Join Us

Heavy rains are lashing Nepal. Landslides and floods have killed at least 112 people in Nepal. Thirteen districts of Bihar have been affected.

Advertisement

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस, ११२ बळी; बिहारला पुराचा धोका | Flood in Nepal

काठमांडू : वृत्तसंस्था
नेपाळमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. भूस्खलन आणि पुरामध्ये नेपाळमध्ये किमान ११२ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. नेपाळमध्ये गुरुवारपासून पाऊस धुमाकूळ घालत आहे.

Heavy rains are lashing Nepal. Landslides and floods have killed at least 112 people in Nepal. Thirteen districts of Bihar have been affected as the flow of Gandak, Kosi, Mahananda and other rivers has increased, affecting 1,41,000 people.

नेपाळला पुराचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. अद्याप ७९ जण बेपत्ता आहे. काठमांडू खो-यातील १६ जण बेपत्ता आहेत. आतापर्यंत ३००० लोकांना वाचवण्यात यश आले. सध्या देशातील ६३ ठिकाणचे राष्ट्रीय महामार्ग ब्लॉक आहेत. काठमांडूमधील २२६ गावे पाण्याखाली गेले आहेत.

बिहारमधील १३ जिल्ह्यांना फटका
नेपाळमधील मुसळधार पावसामुळे बिहार सरकारने उत्तर भागात पुराचा धोका जाहीर केला आहे. गंडक, कोसी, महानंदा आणि इतर नद्यांचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे नदी क्षेत्रातील गावांना इशारा देण्यात आला आहे. नद्यांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असल्याने बिहारमधील १३ जिल्ह्यांना फटका बसला. १,४१,००० लोक प्रभावित झाले आहेत.

 

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »