khabarbat

khabarbat logo

Join Us

The first landing test of the aircraft will take place on the runway of Navi Mumbai International Airport on October 5.

Advertisement

Navi Mumbai Airport | नवी मुंबई विमानतळावर ५ रोजी लॅँडिंग टेस्ट

नवी मुंबई | khabarbat News Network

आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम वेगाने सुरु आहे. आता या विमानतळावरुन लवकरच विमानांचे उड्डाण होणार आहे. ५ ऑक्टोंबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळाच्या धावपट्टीवर विमानाची पहिली लँडिंग टेस्ट होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सिडकोचे चेअरमन आमदार संजय शिरसाट यांनी दिली.

Navi Mumbai : The work of the international airport is going on at a fast pace. Now flights are going to fly from this airport soon. The first landing test of the aircraft will take place on the runway of Navi Mumbai International Airport on October 5.

या विमानतळावर ४ टर्मिनल आहेत. जवळपास ३५० विमाने एकाच वेळी पार्क करू शकतो. नवी मुंबई विमानतळास मेट्रोसह बुलेट ट्रेनची कनेक्टिव्हिटी या ठिकाणी असणार आहे. एक्सप्रेस वे, उपनगरीय रेल्वे, जलमार्गाची कनेक्टिव्हिटी असणार आहे. त्याचा फायदा ठाणे, कल्याण, पुणे, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला होणार आहे. या विमानतळामुळे मुंबई विमानतळावरील भारही कमी होणार आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ रायगड जिल्ह्यात उलवा आणि पनवेल दरम्यान १,६०० हेक्टर जमिनीवर तयार होत आहे. त्यासाठी सिडको नोडेल एजन्सी म्हणून काम करत आहे. १९ हजार ६०० कोटी रुपये खर्च करुन हे विमानतळ उभारण्यात येत आहे. हा ग्रीनफील्ड एअरपोर्ट प्रोजेक्ट ५ टप्प्यात पूर्ण होणार आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »