khabarbat

khabarbat logo

Join Us

Now Tirupati Devasthan has filed a complaint against 'AR Dairy' in the police station.

Advertisement

TTD Laddu Row | प्रसादात भेसळ : ‘एआर’ डेअरी विरुद्ध तिरुपती देवस्थानची तक्रार

khabarbat News Network
तिरुपती | आंध्र प्रदेशातल्या तिरुपती देवस्थानच्या लाडू प्रसादावरुन सध्या घमासान सुरु आहे. या लाडूमध्ये जनावरांची चरबी आणि माशांच्या तेलाचा वापर होत असल्याचे लॅबच्या रिपोर्टवरुन स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आता तिरुपती देवस्थानने ‘एआर डेअरी’विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Ladoo Prasad of Tirupati Temple in Andhra Pradesh is currently in full swing. It is clear from the lab report that animal fat and fish oil are used in this ladoo. After that now Tirupati Devasthan has filed a complaint against ‘AR Dairy’ in the police station.

‘टीटीडी’ अर्थात TTD तिरुमला तिरुपती देवस्थानने जनरल मॅनेजर पी. मुरली कृष्णा यांनी ईस्ट पोलिस ठाण्यात एआर डेअरी फूड प्रायव्हेट लिमिटेड, डिंडीगुल या संस्थेविरोधात विरोधात तक्रार दाखल केली आहे. यापूर्वी सरकारने पोलिस अधिकारी सर्वश्रेष्ठ त्रिपाठींच्या नेतृत्वामध्ये एसआयटी गठीत केली आहे.

‘एफएसएसएआय’कडून चौकशी
एफएसएसएआयने FSSAI एआर डेअरी फूड प्रायव्हेट लिमिटेडला नोटीस पाठवून खाद्य सुरक्षा मानक अधिनियम २०११च्या निकषांचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांचा परवाना का रद्द केला जाऊ नये? अशी नोटीस पाठवली आहे. केंद्रीय प्रयोगशाळेत तुपाच्या तपासणीनंतर तफावत आढळून आल्याचे ‘एफएसएसएआय’ म्हटले आहे.

TTD टीटीडीच्या तूप खरेदी समितीने पुरवठा झालेले सर्व सॅम्पल्स गुजरातच्या आनंद येथील ‘एनडीडीबी काल्फ लॅब’मध्ये पाठवले होते. तुपाच्या मानकांमध्ये तफावत असल्याचे ‘एफएसएसएआय’च्या निदर्शनास आलेले आहे.

दरम्यान, तिरुपती मंदिरामध्ये पुजा-यांनी रविवारी शुद्धीकरणासाठी पूजापाठ केला होता. मंदिर प्रशासनाने याबाबत माहिती देताना लाडू प्रसादाला पावित्र्य बहाल केल्याचे म्हटले होते. या प्रकरणी केंद्र सरकार काय भूमिका घेणार, हे पाहाणे महत्त्वाचे आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »