khabarbat

khabarbat logo

Join Us

Amit Shah interacting with BJP office bearers in Marathwada, Vidarbha. He also expressed his belief that BJP will win 30 seats in Marathwada.

Advertisement

मराठवाड्यात ३० जागा जिंकण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन!

khabarbat News Network
संभाजीनगर । आगामी विधानसभा निवडणुकांची लवकरच घोषणा होणार आहे. सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. या अनुषंगाने दोन दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौ-यावर आहेत. अमित शाह यांनी मराठवाडा, विदर्भातील भाजप पदाधिका-यांशी संवाद साधताना येत्या विधानसभेची रणनिती सांगितलीे. हे सगळं केलं तर मराठवाड्यात ३० जागा नक्की येतील, असा विश्वासही व्यक्त केला.

Sambhajinagar : The upcoming assembly elections will be announced soon. Currently, all the parties are building a strong front. In line with this, Union Home Minister Amit Shah is on a visit to Maharashtra for two days. Amit Shah while interacting with the BJP office bearers in Marathwada, Vidarbha told the strategy for the upcoming assembly. He also expressed his belief that if all this is done, there will be 30 seats in Marathwada.

अमित शाह यांनी संवाद साधताना पदाधिका-यांना काय करावे लागेल, याची रणनिती सांगितली. त्यामध्ये एका बूथवर १० टक्के मते वाढवा. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मंडळ पदाधिका-यांची बैठक घ्या. प्रत्येक मंडळाच्या एका कार्यकर्त्याला शक्ती केंद्र द्यायचे आहे. यानंतर मंडळ अध्यक्ष प्रमुख यांना बूथ अध्यक्षाने १० टक्के मते वाढवण्यासाठी फॉलोअप घ्यावा. दस-यापासून दिवाळीपर्यंत सगळ्या बूथवर एक राऊंड मारायचा आहे. भारत माता की जय म्हणत रॅली काढायची आहे. त्यानंतर ज्या मंदिरात पुजारी असतील, त्याच्या पाया पडायचे. श्रीफळ देऊन १०१ रुपया द्यायचा आहे आणि त्यांचा निवडणुकीसाठी आशीर्वाद घ्यायचा, असा प्लॅन अमित शाहांनी सांगितला.

महाविकास आघाडीतील पक्षांची चिंता करायची नाही. मते वाढवण्यासाठी प्रत्येक घरात जायचे. पदाधिकारी कार्यकर्त्यांचे भांडण मिटवा. आजपासून निवडणुका चालू झाल्या आहेत असे समजा. प्रत्येक बूथवरील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याला भाजपमध्ये घेऊन या. विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना घेऊन या, विजय तुमचाच होईल. हे सगळं केलं तर मराठवाड्यात ३० जागा नक्की येतील, असा विश्वासही अमित शहांनी व्यक्त केला.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »