khabarbat News Network
स्टॉकहोम | स्वीडनने २ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवर स्क्रीन टाईमकरता पूर्णपणे बंद घातली आहे. स्क्रीन टाईममुळे मुलांवर प्रतिकूल प्रभाव पडत होता. अधिक screen time स्क्रीन टाईममुळे मुले आणि किशोरवयीनांमध्ये स्लीप डिसऑर्डर, एंक्झाइटी, डिप्रेशन आणि ऑटिजम होत असल्याचे अनेक अध्ययनात दिसून आले आहे. तसेच मुलांच्या शारीरिक हालचालींमध्ये घट झाली आहे. मुलांना टीव्ही आणि मोबाइल समवेत कुठल्याही स्क्रीनच्या वापराची अनुमती दिली जाऊ नये असे स्वीडन सरकारने स्पष्ट केले आहे.
अमेरिका, आयर्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्स यासारख्या देशांनी यापूर्वीच मुलांसाठी दिशानिर्देश जारी केले आहेत. फ्रान्समध्ये तर ३ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी स्क्रीन वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याची योजना आहे.
Stockholm | Sweden has completely banned screen time for children under the age of 2. Screen time was having an adverse effect on children. Many studies have shown that too much screen time can lead to sleep disorders, anxiety, depression and autism in children and teenagers.
दीर्घकाळापर्यंत स्क्रीन पाहिल्याने डोळ्यांवर डिजिटल तणाव, ड्राय आय डिसिज, मायोपिया म्हणजेच निकट दृष्टीदोषाची समस्या निर्माण होऊ शकते. चीन आणि कोरिया यासारख्या देशांमध्ये ५० टक्के मुलांमध्ये मायोपिया होत आहे. तर अधिक स्क्रीन टाइममुळे ऑटिजम, स्पेक्ट्रम डिसऑर्डरचा धोका आहे. २०२२ मध्ये जपानमध्ये झालेल्या एका अध्ययनात एक तासापेक्षा कमी स्क्रीन टाइममुळे तीन वर्षांच्या वयात एएसडीचा धोका ३८ टक्के जोखिमीशी निगडित होता. तर दोन तासांपेक्षा अधिक स्क्रीन टाइमसोबत ही जोखीम तीनपट अधिक झाली होती. म्हणजेच जितका अधिक स्क्रीन टाइम तितका एएसडीचा धोका अधिक.
किती तास पहावी स्क्रीन….
२-५ वर्षांपर्यंतची मुले : दिवसात कमाल १ तास
६-१२ वर्षांपर्यंतची मुले : दिवसात कमाल २ तास
किशोरवयीन : दिवसात कमाल ३ तास
अधिक स्क्रीन टाइमचे तोटे….
-अधिक स्क्रीन टाइमचा प्रभाव मनावर पडतो, नकारात्मक गोष्टी मेंदूत घर करून बसतात. याचा परिणाम मनावर पडतो.
-स्क्रीनची सवय मुलांमध्ये एंक्झाइटी निर्माण करते. मुलांच्या संतापात भर पडते. यामुळे मुले नीटपणे झोपू शकत नाहीत.
-एकाग्रतेत घट होत असून डिप्रेशनचे शिकार ठरत आहेत. चिडचिडेपणा किंवा निराशा जाणवू शकते.
-अधिक वेळ स्क्रीन पाहिल्यावर मुले सोशल होऊ शकत नाहीत, त्यांना काही सांगितल्यास ओरडू लागतात.
-अधिक स्क्रीन टाइम व्यक्तिमत्त्व विकासात अडथळा ठरतो. अभ्यासातही अडथळे निर्माण होतात.