khabarbat

khabarbat logo

Join Us

It was revealed that the Waqf Board of India has more land than the area of ​​45 countries in the world.

Advertisement

Wakf Board | वक्फ बोर्डाकडे ४५ देशांच्या क्षेत्रफळापेक्षा जास्त जमीन

khabarbat News Network

नवी दिल्ली | केंद्र सरकारने वक्फ बोर्ड कायद्यात संशोधन करण्यासंदर्भात संसदेत प्रस्ताव सादर केल्यानंतर झालेल्या चर्चेदरम्यान वक्फ बोर्डाकडील संपत्ती जाणून देशातील जनतेला आश्चर्याचा धक्का बसला. अधिकृत आकडेवारीनुसार, भारतातील वक्फ बोर्डाकडे जगातील इतर अनेक देशांतील वक्फ बोर्डांपेक्षा किती तरी पट अधिक संपत्ती असल्याचे समोर आले. (wakf board latest news)

It was revealed that the Wakf Board of India has more land than the area of ​​45 countries in the world.

देशातील सध्याच्या वक्फ बोर्ड अ‍ॅक्टमधील वादग्रस्त तरतुदीनुसार, एखादी जमीन वक्फ बोर्डाकडे गेली तर ती पुन्हा फिरवली जाऊ शकत नाही. देशातील सध्याचे सुन्नी वक्फ बोर्ड आणि शिया वक्फ बोर्ड या दोघांची एकूण संपत्ती जाणून कुणाचेही डोके गरगरू शकते. यात १५ वर्षात दुपटीने वाढ झाली. एका आकडेवारीनुसार, देशात रेल्वे, संरक्षण आणि कॅथोलिक चर्चनंतर, सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डाकडेच आहे. (India Latest News)

देशात वक्फ बोर्डाकडे तब्बल ३८०४ चौरस किलोमीटर एवढी जमीन आहे. ही जगातील ४५ देशांच्या क्षेत्रफळापेक्षाही अधिक आहे. उदाहरणच द्यायचे झाल्यास, समोआ २८०३, मॉरीशस २००७, हॉन्गकॉन्ग १११४, बहारीन ७८७ आणि सिंगापूर ७३५ चौरस किलोमीटरवर पसरलेले आहेत. वक्फ बोर्डाकडील जमीन यापेक्षा खूप अधिक आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »