khabarbat

khabarbat logo

Join Us

paperless voting in Bhopal district.

Advertisement

Bhopal Paperless Voting | देशात प्रथमच भोपाळमध्ये पेपरलेस मतदान!

 

khabarbat News Network

Paperless Voting | मध्य प्रदेश राज्य निवडणूक आयोगाने भोपाळ जिल्ह्यात झालेल्या पंचायत पोटनिवडणुकीच्या मतदान केंद्रावर पेपरलेस मतदान यशस्वीरीत्या पार पाडले. या मतदान केंद्रावर ८४ टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला.

The Madhya Pradesh State Election Commission has successfully conducted paperless voting at the polling station for the Panchayat by-election held in Bhopal district. 84 percent people exercised their right to vote at this polling station. State Election Commission Secretary Abhishek Singh said that for the first time in the country, the Commission conducted paperless voting at 295 polling stations of Ratua Ratanpur Gram Panchayat.

राज्य निवडणूक आयोगाचे सचिव अभिषेक सिंह यांनी सांगितले की, आयोगाने देशात प्रथमच रतुआ रतनपूर ग्रामपंचायतीच्या २९५ मतदान केंद्रांवर पेपरलेस मतदान केले. या यशस्वी प्रयोगाच्या पार्श्वभूमीवर पंचायत आणि नगरपालिकांमध्ये पारदर्शक मतदान करण्यासाठी पेपरलेस मतदान केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (bhopal News)

पेपरलेस मतदान केंद्रे तयार करून फॉर्म डिजिटल केले जात आहेत. रतुआ रतनपूरमध्ये पहिल्यांदाच याचा वापर करण्यात आला. या प्रक्रियेमध्ये मतदारांची ओळख आणि मतदान केले हे कळण्यासाठी स्वाक्ष-या आणि अंगठ्याचे ठसे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने रेकॉर्ड केले जातात.

मतदानाची टक्केवारी आणि बॅलेट पेपरचा हिशेबही ऑनलाइन करण्यात आला. दर दोन तासांनी सर्व प्लॅटफॉर्मवर मतदानाच्या टक्केवारीची माहिती उपलब्ध करून देण्यात आली. मतदान पूर्ण झाल्यानंतर बॅलेट (bhopal latest news) पेपरबद्दल सर्व माहिती उमेदवार आणि मतदान प्रतिनिधींना त्यांच्या ई-मेल आयडीवर पाठविण्यात आली, असे या अधिका-याने सांगितले.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »