khabarbat

khabarbat logo

Join Us

मृतदेह जीवंत होण्याची आशा; cryonics scheme चे बुकींग!

Advertisement

मृतदेह जीवंत होण्याची आशा; cryonics scheme चे बुकींग!

२५० हून अधिक लोकांनी आपले मृतदेह cryonics scheme येथे ठेवण्यासाठी बुकिंग केले आहे. यांपैकी बहुतेक अमेरिकन आहेत. यानंतर अनेक जण ब्रिटनमधील आहेत. ५० हून अधिक लोक प्रतीक्षेत आहेत.

लंडन | cryonics scheme मृत्यूनंतर आपला मृतदेह दीर्घकाळापर्यंत सुरक्षि­त ठेवला जावा, यासाठी लोक अक्षरश: लाखो रुपये खर्च करून शवागृहात जागा बूक करत आहेत. या संपूर्ण योजनेला cryonics scheme असे नाव देण्यात आले आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, पण अनेकांनी जिवंत असतानाच यासाठी बुकिंग केले आहे.

More than 250 people have booked to have their bodies deposited at the cryonics scheme. Most of them are Americans. After this many are from Britain. More than 50 people are waiting.

लंडनमध्ये नुकताच एका ५० वर्षीय महिलेचा कॅन्सरने मृत्यू झाला. आपला मृतदेह cryonics scheme अंतर्गत सुरक्षि­त ठेवला जावा अशी तिची इच्छा होती. जेणेकरून एक दिवस पुन्हा जिवंत होता येईल. या व्यक्तीच्या इच्छेनुसार, क्रायोनिक्स इंस्टिट्यूटचे एक्­सपर्ट आले आणि संबंधित व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याऐवजी तिला बर्फात पॅक केले. बॉडी परफ्यूज करण्यात आली आणि शरिरातील रक्त आणि पाण्यावर प्रक्रिया करून त्यांचे रुपांतर cryo protection मिश्रणात करण्यात आले. यामुळे मृतदेह बर्फात असूनही गोठत नाही आणि एखाद्या जिवंत माणसाप्रमाणे सुरक्षित राहतो. यानंतर तो विमानतळावर नेण्यात आला आणि तेथून क्रायोनिक्स संस्थेच्या शवागारात ठेवण्यात आला आहे.

आतापर्यंत २५० हून अधिक लोकांनी आपले मृतदेह cryonics scheme येथे ठेवण्यासाठी बुकिंग केले आहे. यांपैकी बहुतेक अमेरिकन आहेत. यानंतर अनेक जण ब्रिटनमधील आहेत. ५० हून अधिक लोक प्रतीक्षेत आहेत. अनेकांनी आपल्या पाळीव प्राण्यांसाठीही बुकिंग केले आहे.

असे आहे संपूर्ण प्रकरण…
क्रायोनिक्स शवागृहात मृतदेह ठेवण्यासाठी मोठ-मोठे ब्लॉक तयार करण्यात आले आहेत. यात मृतदेह द्रव रुपातील नायट्रोजनमध्ये -१९६ डिग्री सेल्सि­यसमध्ये ठेवली जाते. भविष्यात असे काही तंत्रज्ञान विकसित होईल, ज्याद्वारे मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत केले जाऊ शकेल, या आशेने हा संपूर्ण प्रकार सुरू आहे. असे झाल्यास या लोकांना सर्वप्रथम जिवंत केले जाईल. तसेच, ज्या आजारामुळे त्यांचा मृत्यू झाला त्यावर उपचार करण्यातही यामुळे मदत होईल. ज्या लोकांचे मृतदेह या शवागृहात ठेवण्यात आले आहेत, त्यात विद्यार्थी, शेफ, सचिव आणि प्राध्यापकांचा समावेश आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »