khabarbat

khabarbat logo

Join Us

OPEC Plus countries have agreed to postpone plans to increase production. means reduction in diesel and petrol prices before Dussehra-Diwali.

Advertisement

Petrol-diesel will be cheaper | दसरा-दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार!

 

 टेक्सास | Petrol-diesel will be cheaper विदेशी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. AFP च्या अहवालात असे म्हटले आहे कि, मंगळवारी (ता.१०) ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल ७० डॉलरच्या खाली आली आहे. डिसेंबर २०२१ नंतर ही पहिलीच वेळ आहे. जेव्हा कच्च्या तेलाची किंमत ७० डॉलरच्या खाली गेली आहे.

मंगळवारी ब्रेंट क्रूडची किंमत ३.७ टक्क्यांनी घसरून, ६९.१५ प्रति बॅरल झाली आहे. त्याच वेळी, वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटची किंमत ४.१ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ६५.९० डॉलर झाली आहे. कच्च्या तेलाची ही गेल्या ३ वर्षांतील नीचांकी पातळी आहे. त्यामुळे सरकारी तेल कंपन्यांनी डिझेल आणि पेट्रोलच्या किरकोळ किमती कमी करण्याचा विचार करावा, अशी आशा व्यक्त केली जात आहे. (petrol-diesel latest news)

देशातील तीन सरकारी तेल कंपन्या, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC), हिंदुस्थान पेट्रोलियम (HP) आणि भारत पेट्रोलियम (BP), किरकोळ डिझेल आणि (petrol) पेट्रोलची रिटेल विक्री करतात, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीनुसार तिन्ही कंपन्या डिझेल आणि पेट्रोलच्या किमतीत बदल करतात.

OPEC Plus countries have agreed to postpone plans to increase production until October-November. Overall, there is a high possibility of further reduction in diesel and petrol prices before Dussehra-Diwali.

जवळपास ६ महिन्यांपासून डिझेल आणि पेट्रोलच्या किरकोळ दरात कोणताही बदल झालेला नाही. यापुर्वी १४ मार्च २०२४ रोजी सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत शेवटचा दिलासा देण्यात आला होता. त्यावेळी डिझेल (diesel) आणि पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर २-२ रुपये कपात करण्यात आली होती.

सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता कच्चे तेल आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे. तेल उत्पादक देशांकडून उत्पादन कपातीमुळे अपेक्षित असलेला पाठिंबाही तूर्तास पुढे ढकलण्यात आला आहे. ओपेक (OPEC) प्लसमध्ये समाविष्ट देशांनी उत्पादन वाढवण्याची योजना ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचे मान्य केले आहे. एकूणच दसरा-दिवाळीपूर्वी डिझेल आणि पेट्रोलच्या दरात आणखी कपात होण्याची दाट शक्यता आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »