khabarbat

khabarbat logo

Join Us

As the local villagers, farmers are opposing the land acquisition, it has now been decided to cancel the land acquisition of Bhaktipeth Highway and Industrial Highway along with Shaktipeth Highway. All these three highways were going to play a major role in strengthening and facilitating the communication system of the state. But as the farmers opposed the land acquisition, MSRDC has stopped the land acquisition.

Advertisement

शक्तीपीठानंतर भक्तीपीठ, औद्योगिक महामार्गही रद्द | Bhakti Peetha, Industrial Highway also cancelled

khabarbat News Network

 Bhakti Peetha, Industrial Highway also cancelled | मुंबई : महाराष्ट्र सरकारने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गानंतर शक्तीपीठ, भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्गाचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासंदर्भात तीनही महामार्गांच्या भूसंपादनाला सुरूवात करण्यात आली. मात्र, स्थानिक ग्रामस्थ, शेतक-यांनी भूसंपादनाला विरोध केल्याने आता शक्तिपीठ महामार्गापाठोपाठ भक्तीपीठ महामार्ग आणि औद्योगिक महामार्गाचेही भूसंपादन देखील रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

As the local villagers, farmers are opposing the land acquisition, it has now been decided to cancel the land acquisition of Bhaktipeth Highway and Industrial Highway along with Shaktipeth Highway. All these three highways were going to play a major role in strengthening and facilitating the communication system of the state. But as the farmers opposed the land acquisition, MSRDC has stopped the land acquisition.

राज्याची दळणवळण व्यवस्था मजबूत व सुलभ करण्यात हे तीनही महामार्ग मोठी भूमिका बजावणार होते. मात्र भूसंपादनाला शेतक-यांनी विरोध केल्याने ‘एमएसआरडीसी’ने भूसंपादन थांबवले आहे.

‘एमएसआरडीसी’ने शक्तीपीठ महामार्गापाठोपाठ पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग आणि सिंदखेड राजा-शेगाव भक्तीपीठ महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया रद्द केली. सुमारे २५ ते ३० हजार कोटी रुपये खर्चाचे हे प्रकल्प आहेत. तसेच, ‘एमएसआरडीसी’ने पुणे-नाशिक ‘औद्योगिक महामार्ग’ बांधण्याचा निर्णय घेतला होता. २१३ किमी लांबीच्या या महामार्गामुळे दोन शहरांचे अंतर केवळ दोन तासांत पार होणे अपेक्षित होते.

याचबरोबर, समृद्धी महामार्गावरून तीर्थक्षेत्र शेगावला अतिजलद जाता यावे, यासाठी सिंदखेडराजा-शेगावदरम्यान समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्याचा निर्णयही ‘एमएसआरडीसी’ने घेतला होता. हा १०९ किमी लांबीचा भक्तीपीठ महामार्ग प्रस्तावित होता. या चार पदरी रस्ते प्रकल्पाला सरकारने मान्यता दिल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याची तयारी सुरू होती. मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे प्रकल्पाला खीळ बसली आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »