khabarbat

khabarbat logo

Join Us

In the first eight months of the year, 452 big companies in the America went bankrupt. This is the second highest number of bankruptcies in the last 14 years.

Advertisement

452 American companies went bankrupt | अमेरिकेतील ४५२ कंपन्या ८ महिन्यांत दिवाळखोर!

वॉशिंग्टन । अमेरिकेतील हजारो छोट्या-मोठ्या कंपन्या दिवाळखोरीत गेल्या आहेत. वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत देशातील ४५२ बड्या कंपन्या दिवाळखोरीत गेल्याची माहिती समोर आली. गेल्या १४ वर्षांतील हा इतक्या प्रमाणात कंपन्या दिवाळखोरीत गेल्याचा हा दुसरा सर्वाधिक आकडा आहे.

Thousands of small and large companies in America have gone bankrupt. In the first eight months of the year, 452 big companies in the country went bankrupt. This is the second highest number of bankruptcies in the last 14 years.

२०२० मध्ये जेव्हा कोरोनाने थैमान घातले तेव्हा वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत म्हणजेच ऑगस्टपर्यंत लॉकडाऊनमुळे ४६६ कंपन्या दिवाळखोर झाल्या होत्या. यावर्षी ऑगस्टमध्ये ६३, तर जुलैमध्ये ४९ कंपन्या दिवाळखोरीत गेल्या. ऑगस्ट हा गेल्या चार वर्षांतील अमेरिकी उद्योगासाठी चौथा सर्वात वाईट महिना होता.

सेक्टरनुसार सांगायचे झाले तर अमेरिकेत सर्वाधिक फटका हा कंझ्युमर डिस्क्रेशनरी सेक्टला बसला. यातील ६९ मोठ्या कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळला. यानंतर इंडस्ट्रियल सेक्टरचा क्रमांक येतो. यातील ५३ कंपन्या दिवाळखोर झाल्या, तर हेल्थकेअर विभागातील ४५ कंपन्या दिवाळखोरीत गेल्या.

कोरोनानंतरही पहिलीच अशी वेळ आहे, जेव्हा अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदावल्याचे दिसत आहे. देशात मंदीच्या शक्यतेसोबतच विक्रमी संख्येत कंपन्या दिवाळखोरीत जाण्याचीही शक्यता आहे. देशात बेरोजगारीही वाढली आहे ग्राहक खर्चातही घसरण झालेली दिसत आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »