The last assembly elections in Maharashtra were held in October 2019. Therefore, the new assembly is expected to come into existence before that. There are indications that the state may hold assembly elections in October 2024 after the implementation of the code of conduct in September. Home Minister Amit Shah is staying in Mumbai and in his presence the Grand Alliance leaders are going to discuss seat allocation today and tomorrow.
khabarbat News Network
मुंबई । महाराष्ट्रातील मागील विधानसभा निवडणुका ऑक्टोबर २०१९ मध्ये झाली होत्या. त्यामुळे नवी विधानसभा त्यापूर्वीच अस्तित्वात येणे अपेक्षित आहे. सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागू होऊन ऑक्टोबर २०२४ मध्ये राज्यात विधानसभेसाठी निवडणूक होऊ शकते, असे संकेत मिळत आहेत. गृहमंत्री अमित शहा मुंबई मुक्कामी असून त्यांच्या उपस्थितीत महायुतीचे नेते जागा वाटपावर आज आणि उद्या चर्चा करणार आहेत.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यंदाची विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये होणा-या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने अद्याप आपला फॉर्म्युला निश्चित केलेला नाही. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी विधानसभेतही भाजपने महायुतीतील घटक पक्षांपेक्षा जास्त जागा लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
दरम्यान, सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजप सर्वाधिक आमदार असलेला पक्ष आहे. भाजपकडे १०५ आमदार आहेत. महायुतीत भाजपसोबत अजित पवारांची राष्ट्रवादीची काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना हे दोन पक्ष आहेत. सह्याद्री अतिथिगृहावर रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह महायुतीच्या महत्वाच्या नेत्यांसोबत अमित शहांची बैठक होणार आहे. तर या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेही उपस्थित राहणार आहेत. विधानसभेच्या जागावाटपासह महत्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.