khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

ठाकरेंचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न भंगणार; शरद पवार, काँग्रेस नेत्यांचा स्पष्ट नकार

The Chief Ministerial face of the Mahavikas Aghadi should be decided before the assembly elections. Uddhav Thackeray is constantly demanding that I am ready to support him if he wants. But after Sharad Pawar took a clear stand on this demand, now the Congress leaders have also supported it. Uddhav Thackeray’s dream of being the Chief Minister is showing signs of breaking since Sharad Pawar has consistently refused to make him the chief ministerial candidate.

khabarbat News Network

मुंबई । विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवावा. हवं तर मी त्याला पाठिंबा द्यायलाही तयार आहे अशी मागणी उद्धव ठाकरेंकडून सातत्याने होत आहे. मात्र या मागणीवर शरद पवारांनी स्पष्ट भूमिका मांडल्यानंतर आता काँग्रेस नेत्यांनी देखील त्याचे समर्थन केले आहे. शरद पवार सातत्याने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरविण्यास स्पष्ट नकार देत असल्यामुळे उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न भंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

शरद पवारांच्या विधानावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले की, शरद पवार चुकीचे काय बोलले, महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडणुकीला पुढे जाणार आहोत. महाविकास आघाडीचे संख्याबळ आल्यानंतरच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवला जाईल.

मुख्यमंत्री चेह-याबाबत आताच आग्रह धरण्यात काही अर्थ नाही. मुख्यमंत्रिपदाबाबतीत महाविकास आघाडी एकत्र बसून निर्णय घेईल. आकड्यांच्या आधारावर विधानसभा निवडणुकीननंतर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण होणार हे ठरणार आहे. मुख्यमंत्री कोण? हे आता महत्त्वाचे नाही.

ज्याची जास्त संख्या त्याचा मुख्यमंत्री असे सूत्र केले तर त्यात पाडापाडी होते. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा, तुम्ही जे नेतृत्व द्याल त्याला मी पाठिंबा द्यायला तयार आहे, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी जाहिरपणे महाविकास आघाडीच्या मेळाव्यात मांडली होती. परंतु त्यावर काँग्रेस आणि शरद पवारांकडून सातत्याने नकार देण्यात येत आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »