khabarbat

khabarbat logo

Join Us

Due to the BLA threatened Chinese, It looks like the Chinese CPEC project is going to get stuck once again.

Advertisement

Baloch Army threatened Chinese : बलोच आर्मी आक्रमक; चीनी लोकांना पाक सोडण्याचे फर्मान

Now the Baloch Liberation Army has ordered Chinese citizens living in Pakistan to leave Pakistan. The BLA has also threatened that if any Chinese citizen is found in their area, they will be killed. It looks like the Chinese project is going to get stuck once again. China has deployed a large number of its engineers and officials for the construction of the CPEC corridor.

इस्लामाबाद | बलोच लिबरेशन आर्मीने गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानात जबरदस्त धुमाकुळ घातला आहे. यामुळे पाकिस्तानी सैन्याचेही हाल बेहाल झाले आहेत. आता बलोच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानात राहणा-या चिनी नागरिकांना पाकिस्तान सोडण्याचे फरमान सोडले आहे. जर आपल्या भागात कुणी चिनी नागरिक आढळला, तर ठार केला जाईल, अशी धमकीही बीएलएने दिली आहे.

चिनी नागरिकांना निशाना बनवण्यासाठी बलोच आर्मीने एक स्पेशल युनिट तयार केली आहे. बलोच आर्मीच्या एका फिदायीन गटाने नुकताच पाकिस्तानात प्रचंड विध्वंस करत ७० हून अधिक लोक मारले आहेत. यात पाकिस्तानी सैन्य आणि पोलिसातील १४ जवानांचा समावेश आहे.

खरे तर, चीन पाकिस्तानमध्ये सीपीईसी कॉरिडॉर तयार करत आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी चीन पाण्यासारखा पैसा खर्च करत आहे,  मात्र बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी लष्कराविरोधात ज्या प्रकारे आघाडी उघडली आहे, त्यावरून चीनचा प्रकल्प पुन्हा एकदा अडकणार असल्याचे दिसत आहे. सीपीईसी कॉरिडॉरच्या बांधकामासाठी चीनने आपले अभियंते आणि अधिकारी मोठ्या संख्येने तैनात केले आहेत.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »