khabarbat News Network
नवी दिल्ली | कॉम्प्युटर क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘Dell’ने मॅनेजर लेव्हलच्या सुमारे १२,५०० कर्मचा-यांना कामावरून डच्चू देण्यात आला. तसेच कंपनीने सेल्स डिव्हिजनमध्ये मोठी फेररचना जाहीर केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कपातीचा फटका प्रामुख्यानं व्यवस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापकांना बसला आहे.
यामुळे ऑपरेशन्सचे आधुनिकीकरण आणि ‘AI’वर लक्ष केंद्रित करण्याच्या रणनीतीचा एक भाग म्हणून ही कर्मचारी कपात करण्यात आली. ‘Business Insider’ने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीनं ६ ऑगस्ट रोजी अंतर्गत मेमोमध्ये कर्मचा-यांना या बदलांची माहिती दिली, ज्यात सेल्स टीमचं सेंट्रलायझेशन करणं आणि नवीन एआय-केंद्रित सेल्स युनिट तयार करण्याच्या योजनेची रूपरेषा देण्यात आली.
‘News Byte’ने दिलेल्या वृत्तानुसार, सुमारे १२,५०० कर्मचा-यांना कामावरून काढून टाकण्याचा फटका बसला आहे. याचा परिणाम डेलच्या सुमारे १० टक्के कर्मचा-यांवर झाला आहे. ग्लोबल सेल्स मॉडर्नायझेशन अपडेट या नावानं हा मेमो सीनिअर एक्झिक्युटिव्ह बिल स्कॅनेल आणि जॉन बर्न यांच्याद्वारे पाठवण्यात आला.