khabarbat

khabarbat logo

Join Us

The GST department has taken action against more than 300 Chinese companies for their involvement in the cyber fraud case.

Advertisement

Cyber fraud I जुगाराच्या नादी लावणा-या ३०० चीनी कंपन्यांवर कारवाई

The GST department has taken action against more than 300 Chinese companies for their involvement in the cyber fraud case. Their GST registration has been cancelled. These companies were offering online advertisements to attract gamblers.

khabarbat News Network
नवी दिल्ली I भारत सरकारने चीनी कंपन्यांविरोधात कठोर पावले उचलली आहेत. सायबर फसवणूक प्रकरणात विदेशातील कंपन्यांची भूमिका समोर आली आहे. त्यानंतर चीनी कंपन्यांवर कारवाई सुरु झाली आहे. सायबर फसवणूक प्रकरणात संबंध असल्याच्या कारणावरुन चीनच्या ३०० पेक्षा जास्त कंपन्यांच्या विरोधात जीएसटी विभागाने पाऊल उचलले आहे. त्यांची जीएसटी नोंदणी रद्द केली आहे.
या कंपन्या ऑनलाईन जाहिराती देऊन जुगार खेळण्यासाठी आकर्षित करत होत्या. सुरक्षा संस्थांकडून मिळालेल्या माहितीनंतर जीएसटी विभागाने हे पाऊल उचलले आहे.

जीएसटी विभागाने १५ हजार कोटी रुपयांच्या फ्रॉडमध्ये सहभागी असलेल्या आरोपींची चौकशी केली. त्यानंतर सुरक्षा संस्थांकडून माहिती घेतली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ३०० कंपन्यांची नोंदणी रद्द केली आहे. या कंपन्यांनी तीन वर्षांपासून रिटर्नसुद्धा दाखल केले नाही. या कंपन्यांकडून चीनमध्ये पैसे पाठवले जात होते. त्याचा तपास आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने केला. त्यानंतर सायबर फसवणुकीचा प्रकार समोर आला.

नोएडा पोलिसांना जीएसटी फ्रॉड प्रकरणातील सायबर गुन्हेगारांचा संबंध चीनशी असल्याचे तपासात समोर आले. सायबर गुन्हेगार सर्वसामान्य लोकांना लिंक पाठवून त्यांना ऍप डाऊनलोड करण्यास लावत होते. त्यातील अनेक ऍप चीनमधील होते.

या ऍपचे काम चालवण्यासाठी सायबर गुन्हेगार नोएडामध्ये बनावट फर्म तयार करत होते. त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर जीएसटीची चोरी करतात. तसेच दुसरीकडे सर्वसामान्य लोकांना विविध आमिष दाखवून त्यांची फसवणूक करतात. जीएसटी विभागाच्या कारवाईमुळे आता या प्रकारांना वचक बसणार आहे.
तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »