T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये सूर्यकुमार यादवने घेतलेला कॅच आपल्याला आठवतोच. मात्र त्याहूनही एक ग्रेट कॅच सध्या व्हायरल होत आहे. क्रिकेटमध्ये आपण नेहमीच पाहतो की, क्षेत्ररक्षण करतांना खेळाडू पायाने चेंडू वाचवण्याचा प्रयत्न करतात. मात्र पायाने कॅच घेतल्याचे क्वचितच पहायला मिळते. अशावेळी ECS बल्गेरिया 2024 मध्ये असाच एक कॅच एक फिल्डरने घेतला आहे. आणि त्याचा हा ग्रेट कॅच सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. Afyonkarahisar SHS संघाच्या कुरसद दलयान या खेळाडूने एक अजब कॅच पकडला. कुर्सदने पायाने चेंडू हवेत फेकला नंतर एका हाताने तो पकडला पुढे पंचाकडे अपिल केली. त्यानंतर पंचाने फलंदाजाला आऊट म्हणून घोषित केले. यामुळे वाद प्रतिवाद सुरू झाले आहेत.
https://x.com/EuropeanCricket/status/1819946842848633093