khabarbat

khabarbat logo

Join Us

waqf board amendment

Advertisement

वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा, मोदी सरकार विधेयक मांडणार

It has come to light that the PM Modi government will introduce the Waqf Act Amendment Bill in Parliament on August 5. After this bill is passed in Parliament, the powers of Waqf Board will be reduced.

khabarbat News Network

नवी दिल्ली : वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे. केंद्र सरकार याबाबत नवीन विधेयक आणणार असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रिमंडळाने वक्फ कायद्यात सुमारे ४० सुधारणांना मंजुरी दिली आहे, वक्फ कायद्यात सुधारणा करणारे विधेयक या आठवड्यात संसदेत मांडले जाण्याची शक्यता आहे.

मोदी सरकार वक्फ कायद्यातील दुरुस्ती विधेयक ५ ऑगस्ट रोजी संसदेत मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर वक्फ बोर्डाचे अधिकार कमी होतील.

मोदी सरकारने प्रस्तावित केलेल्या प्रमुख दुरुस्त्यांमध्ये वक्फ बोर्डांची पुनर्रचना करणे, बोर्डांची रचना बदलणे आणि बोर्ड घोषित करण्यापूर्वी वक्फ मालमत्तांची पडताळणी सुनिश्चित करणे यांचा समावेश आहे.

केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्य वक्फ बोर्डांच्या संरचनेत बदल करण्यासाठी वक्फ कायद्याच्या कलम ९ आणि कलम १४ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव विधेयकात असल्याचे सांगण्यात आले आहे.

मोदी सरकारच्या विधेयकात राज्य वक्फ बोर्डांनी दावा केलेल्या वादग्रस्त जमिनीची नव्याने पडताळणी करण्याची मागणीही प्रस्तावित आहे. या विधेयकांतर्गत वक्फ बोर्डाने दावा केलेल्या मालमत्तेची सक्तीने पडताळणी केली जाईल.

२८ राज्यात वक्फ बोर्ड : गेल्या वर्षी मे महिन्यात दिल्ली उच्च न्यायालयाने आदेश दिला होता. केंद्र सरकार १२३ मालमत्तांची प्रत्यक्ष तपासणी करू शकते. या मालमत्तांबाबत दिल्ली वक्फ बोर्ड दावा करत आहे. यानंतर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये केंद्रीय नगरविकास मंत्रालयानेही या सर्व मालमत्तांना नोटीस बजावली होती. सध्या देशभरात २८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ३० वक्फ बोर्ड आहेत.

वक्फ बोर्डाच्या अधिकारावर अंकुश : या विधेयकाद्वारे मोदी सरकार वक्फ बोर्डाच्या अधिकारावर अंकुश ठेवण्यासाठी नियम आणणार आहे. वक्फ बोर्ड कोणतीही मालमत्ता वक्फ बोर्डाची मालमत्ता म्हणून घोषित करते. या विधेयकात वक्फ बोर्डाचे अधिकार कमी करण्याबाबत सांगण्यात आले आहे. वक्फ बोर्डाच्या दाव्याची पडताळणी करण्याचा सरकार विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »