khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

संभाजीनगर, धाराशिव ‘जैसे थे’! नामांतर विरोधी याचिका फेटाळली

khabarbat News Network

A few months ago, the Maharashtra government had decided to change the names of two cities namely Aurangabad and Osmanabad. A challenge was given in the Supreme Court against this decision. However, the Supreme Court rejected the petition challenging the Maharashtra government. This has given relief to the state government.

नवी दिल्ली । महाराष्ट्र सरकारने काही महिन्यापूर्वी औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांची नावे बदलण्याबाबत निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. मात्र सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकार विरोधात आव्हान देणारी याचिका फेटाळली. यामुळे राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे.

औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव बदलून धाराशिव करण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

याचिकाकर्त्यांनी यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारच्या निर्णयाला कोणतेही कायदेशीर आव्हान न दिल्याने निर्णय कायम ठेवला होता. यानंतर याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

नाव बदलणे हा सरकारचा अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यासाठी न्यायालयीन पुनरावलोकनाची गरज नाही. तुमचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतरच हायकोर्टाने सविस्तर आदेश दिले आहेत. त्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही. यापूर्वी ८ मे रोजी उच्च न्यायालयाने औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्याचा राज्य सरकारचा निर्णय कायम ठेवला होता. हा निर्णय कायदेशीरदृष्ट्या योग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. आता सर्वोच्च न्यायालयानेही त्यास मान्यता दिली आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »