khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

Heavy rains in kedarnath I केदारनाथमध्ये मुसळधार; २५०० भाविक बचावले

The government has intensified rescue operations after the devastation caused by heavy rains in the Kedarnath valley. About 2,537 devotees trapped in Kedarnath area have been rescued.

kedarnath rescue operation

khabarbat News Network

केदारनाथ I केदारनाथ खो-यात मुसळधार पावसामुळे झालेल्या विध्वंसानंतर सरकारने बचावकार्य तीव्र केले आहे. केदारनाथ परिसरात अडकलेल्या जवळपास २५३७ भाविकांना वाचविण्यात यश आले आहे. ‘एसडीआरएफ’सोबतच लष्कराचे चिनूक आणि एमआय-१७ हेलिकॉप्टरही बचाव कार्यासाठी उतरले आहे.

डीएम सौरभ गहरवार आणि एसपी विशाखा अशोक भदाणे यांनी दिलेल्या माहिती नुसार, गुरुवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास बचाव कार्य सुरू झाले आहे. भीमबलीच्या जवळपास अडकलेल्या ७३७ यात्रेकरुंना हेलीकॉप्टरच्या सहाय्याने काढण्यात आले आहे. तर २०० यात्रेकरूंना रस्त्याने आणण्यात आले. या अभियानात पाच हेलिकॉप्टरचा समावेश आहे.

सर्वाधिक यात्रेकरू गौरीकुंडाजवळ अडकलेले आहेत. एसडीआरएफचे कमांडन्ट मणिकांत मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरीकुंड येथून १७०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. घटनास्थळी अद्यापही १३०० जण अडकलेले आहेत. अलास्का लाइटच्या मदतीने रात्रभर रेस्क्यू ऑपरेशन सुरू राहणार आहे. मंडलमध्ये अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »