khabarbat

Advertisement

ISIS : देशात साखळी हल्ल्याचा कट उधळला!

 

संभाजीनगरचे ५० जण ISIS च्या जाळ्यात
इंजिनियर मोहम्मद झोहेब खान द्यायचा प्रशिक्षण

 

khabarbat News Network

 

संभाजीनगर : आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इसिस (ISIS)च्या संपर्कात असल्याच्या आरोपाखाली हर्सूल परिसरात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) अटक केलेल्या मोहम्मद झोहेब खान याच्यामार्फत ५० पेक्षा अधिक तरुणांना व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपद्वारे स्फोटके तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन देशात साखळी हल्ले घडविण्याचा कट होता, असा धक्कादायक आरोप (NIA) एनआयएने केला आहे. शुक्रवारी एनआयएच्या मुंबई न्यायालयात दाखल दोषारोपपत्रात हे आरोप ठेवण्यात आले आहेत.

मोहम्मद झोहेब खान याला एनआयएने १५ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगरमधील हर्सूल परिसरातील घरातून अटक केली होती. लिबियास्थित त्याचा नातेवाईक मोहम्मद शोएब खान याने त्याला इसिस(ISIS)मध्ये भरती केले होते. झोहेबला आंतरराष्ट्रीय हस्तकांकडून मार्गदर्शन सुरू होते, असे एनआयएच्या तपासात निष्पन्न झाले.

More than 50 youths from (Chatrapati Sambhajinagar) Aurangabad (Maharashtra) and surrounding areas were included in this Zoheb Khan's whatsapp group.More than 50 youths from (Chatrapati Sambhajinagar) Aurangabad (Maharashtra) and surrounding areas were included in this Zoheb Khan’s whatsapp group. In it, he was constantly sharing videos of making explosives and making IEDs.

सात महिन्यांपासून ‘एनआयए’ने त्याच्यावर पाळत ठेवली होती. त्याने इसिसची ‘बैत’ घेतली होती. वर्क फ्रॉम होमचे कारण दाखवून तो घरातून सूत्रे हलवत होता. एनआयएच्या पथकाने १५ फेब्रुवारी रोजी शहरात ९ ठिकाणी छापे मारत झोहेबला अटक केली. त्याच्याकडून लॅपटॉप, महत्त्वाची कागदपत्रे, इसिसच्या कट्टरवादाशी संबंधित पुस्तके जप्त केली होती.

दोषारोपपत्रात ठेवलेला ठपका…

– लिबिया स्थित शोएबने झोहेबला इसिसमध्ये सहभागी केले होते. – दोघे मिळून भारतविरोधी कटकारस्थान रचत होते.

– देशातील प्रमुख संवेदनशील स्थळांवर दहशतवादी हल्ले करण्यासाठी तरुणांची भरती करत होते.

– या सर्व प्रकरणाचे ते मुख्य सूत्रधार होते.

– हल्ल्यानंतर झोहेब अफगाणिस्तान किंवा तुर्कस्तान मार्गे सिरियाला जाणार होता.

इसिसच्या वेबसाईटची जबाबदारी

अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला झोहेब बंगळुरूमध्ये नामांकित कंपनीत वेब डेव्हलपर होता. गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून तो दहशतवादाकडे वळला. त्यानंतर तो इसिसचे संकेतस्थळ विकसित करण्यासाठी देखील मदत करीत असल्याचे एनआयएने दोषारोपपत्रात म्हटले आहे. याद्वारे तो देशभरातील तरुणांना हिंसक विचारांकडे वळविण्यासाठी प्रोत्साहन देत होता.

५० पेक्षा अधिक तरुण संपर्कात

देशात इसिसच्या कारवायांसाठी तरुणांची भरती करण्याची जबाबदारी झोहेबवर होती. त्यासाठी त्याने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून संभाजीनगर व आसपासच्या परिसरातील ५० पेक्षा अधिक तरुणांना या ग्रुपमध्ये समाविष्ट केले होते. त्यात तो सातत्याने स्फोटकांची निर्मिती आणि आयईडी बनविण्याचे व्हिडीओ शेअर करीत होता.

त्याने कारवाईचा आराखडाही तयार केला होता. ज्यामध्ये देशातील विविध ठिकाणांवर दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन, तयारी आणि अंमलबजावणी व हल्ल्यांच्या अंमलबजावणीनंतर काय पाऊल उचलायचे, याचेदेखील पुरावे एनआयएच्या हाती लागले आहेत.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »