फतेहपूर : साप बदला घेतात असे बोलले जाते, मात्र अशीच एक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. उत्तर प्रदेशातील फतेहपूरमध्ये विकास दुबे या तरुणाला दीड महिन्यात सहाव्यांदा साप चावला. या घटनेने तरुणाच्या कुटुंबासह परिसरातील नागरिक हादरले. त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टरही हैराण झाले आहेत. विकास दुबे (२४) या तरुणाला दीड महिन्यात एक-दोनदा नव्हे तर सहा वेळा साप चावला. प्रत्येक वेळी उपचारानंतर विकास बरा झाला. त्याच्यावर अजूनही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
In Uttar Pradesh’s Fatehpur, Vikas Dubey was bitten by a snake for the sixth time in a month and a half. This incident shook the local people along with the family of the young man.
पीडित विकास दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, साप चावण्यापूर्वीच साप आपल्यावर हल्ला करणार आहे हे त्याला जाणवते. विकास दुबे यांनी सांगितले की, २ जून रोजी रात्री ९ वाजता अंथरुणावरुन उठत असताना त्याला पहिल्यांदा साप चावला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला जवळच्या खासगी नर्सिंग होममध्ये दाखल केले.
उपचार करून घरी परतल्यावर ८ दिवसांनी म्हणजेच १० जूनच्या रात्री त्याला दुस-यांदा साप चावला. उपचार झाले आणि तो पुन्हा बरा होऊन घरी परतला. दोन वेळा झालेल्या या घटनेमुळे विकास थोडा घाबरला होता. पण हे प्रकरण इथेच थांबले नाही. सर्वांनी त्याला साप चावू नये म्हणून काही दिवस घरापासून दूर राहण्याचा सल्ला दिला.
घाबरलेल्या विकासने घरच्यांचा सल्ला ऐकला. यानंतर तो मावशीच्या घरी गेला. पण मावशीच्या घरीही सापाने त्याला सोडले नाही. २८ जून रोजी विकासला त्याच्या मावशीच्या घरी पाचव्यांदा साप चावला. त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल केले. यातुनही तो बरा होऊन घरी आला. यानंतर तो मामाच्या घरी राहायला गेला. पण इथेही सापाने त्याला सोडले नाही. गेल्या रविवारी विकासला सापाने सहाव्यांदा चावा घेतला. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.