khabarbat

Ather Electric Vehicle

Advertisement

‘Ather’चा संभाजीनगरात प्रकल्प, चार हजार जणांना मिळेल रोजगार

khabarbat News Network

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ईव्ही क्षेत्रातील बडी स्टार्टअप कंपनी २००० कोटींची गुंतवणूक करणार आहे. ईव्ही (Ev) दुचाकी निर्माण करणारी एथर ही कंपनी छत्रपती संभाजीनगरमध्ये उत्पादन प्रकल्प उभारणार असून याद्वारे सुमारे ४००० रोजगार निर्माण होतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

EV two-wheeler manufacturer Ather will set up a manufacturing plant in (Bidkin-Aurangabad) Chhatrapati Sambhajinagar, which will create around 4,000 jobs.

एथर एनर्जी कंपनी लवकरच ऑरिक सिटीच्या बिडकीन (Bidkin) एमआयडीसीमध्ये १०० एकरावर आपला प्रकल्प उभारणार आहे. महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प डीएमआयसीमध्ये उभारण्यासाठी दोन वर्षांपूर्वी चाचपणी करण्यास सुरुवात केली होती. अधिका-यांनी जागेचीही पाहणी केली होती. एवढेच नव्हे तर येथील सीएमआयएच्या पदाधिका-यांसोबतही चर्चा केली होती.

सरकारकडून कंपनीला आवश्यक ते आश्वासन मिळाल्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळाने बिडकीन डीएमआयसीमध्ये आपला प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. एथरचा हा तिसरा उत्पादन प्रकल्प आहे. या कंपनीला हिरो मोटो कॉर्पचे आर्थिक पाठबळ आहे.

(Ather) एथरचा अत्याधुनिक प्लांट दरवर्षी १ दशलक्ष युनिटपर्यंत वाहने आणि बॅटरी पॅक दोन्ही तयार करणार आहे. समृद्धी द्रुतगती मार्गाद्वारे प्रभावी कनेक्टिव्हिटीमुळे, गुंतवणूकदार या मराठवाड्याची क्षमता वाढवत आहेत. एथरने मराठवाड्याची केलेली निवड महाराष्ट्राच्या विकासकथेचे नेतृत्व करेल, असा विश्वास  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Most Admired E-paper I khabarbat.com
तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »