मक्का : वृत्तसंस्था
सौदी अरेबियातील मक्का येथे १२ जून ते १९ जून या कालावधीत चाललेल्या हज यात्रेत ५७७ यात्रेकरूंचा मृत्यू झाला. यामध्ये ६८ भारतीयांचा समावेश आहे. याचे कारण सौदी अरेबियातील कडक उष्मा असल्याचे सांगितले जात आहे. या वर्षी सुमारे १८ लाख यात्रेकरू हजसाठी दाखल झाले आहेत. यापैकी १६ लाख लोक इतर देशांतील आहेत.
577 pilgrims died during the Hajj pilgrimage in Mecca, Saudi Arabia from June 12 to June 19. This includes 68 Indians. The reason for this is said to be the harsh heat in Saudi Arabia.
१७ जून रोजी मक्काच्या ग्रँड मशिदीमध्ये तापमान ५१.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. सौदी अरेबियाच्या अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, मक्कामध्ये हवामान बदलाचा खोलवर परिणाम होत आहे. येथील सरासरी तापमान दर १० वर्षांनी ०.४ अंश सेल्सिअसने वाढत आहे.
द गार्डियनच्या वृत्तानुसार, मृतांमध्ये ३२३ नागरिक इजिप्शियन आहेत, तर ६० जॉर्डनचे आहेत. याशिवाय इराण, इंडोनेशिया आणि सेनेगल येथील यात्रेकरूंचाही मृत्यू झाला आहे. २ अरब राजनयिकांनी एएफपीला सांगितले की, बहुतेक मृत्यू उष्णतेमुळे झालेल्या आजारामुळे झाले आहेत.
मृत्यू झालेल्यांमध्ये इजिप्शियन यात्रेकरूंची संख्या जास्त आहे. कारण त्यांच्यापैकी अनेकांनी हजसाठी नोंदणी केली नव्हती. या महिन्याच्या सुरुवातीला सौदी अरेबियाने हजारो नोंदणी नसलेल्या यात्रेकरूंना मक्कातून बाहेर काढले.
मागील वर्षी हजला गेलेल्या २४० यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. यातील बहुतांश इंडोनेशियातील होते. सौदीने सर्व प्रवाशांना छत्री वापरण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय त्यांना सतत पाणी पिण्यास आणि सूर्यप्रकाश टाळण्यास सांगितले जात आहे.
२ हजार यात्रेकरूंवर उपचार
इजिप्तच्या परराष्ट्रमंत्र्यांनी मंगळवारी सांगितले की, ते सौदी अधिका-यांच्या सहकार्याने बेपत्ता लोकांना शोधण्यासाठी मोहीम राबवित आहेत. सौदी अरेबियाने सांगितले की, उष्णतेमुळे आजारी पडलेल्या सुमारे २ हजार यात्रेकरूंवर उपचार केले जात आहेत.