khabarbat

Advertisement

Ayodhya : अयोध्येत ३३ फूट लांब, ३४०० किलोचा धनुष्यबाण; ३९०० किलोची गदा !

अयोध्या : Khabarbat News Network
देशातील सर्वात लांब धनुष्यबाण अयोध्येत बसवण्यात येणार आहे. धनुष्याची लांबी ३३ फूट आणि वजन ३४०० किलो आहे. धनुष्यबाणासोबतच ३९०० किलो वजनाची गदाही असेल.

गदा, धनुष्य आणि बाण पंच धातूपासून बनवले आहेत. हे राजस्थानमधील शिवगंज, सुमेरपूर येथे असलेल्या श्रीजी सनातन सेवा संस्थेने बनवले आहे.

The longest bow and arrow in the country will be installed in Ayodhya. The length of the bow is 33 feet and the weight is 3400 kg. Along with the bow and arrow, there will be a mace weighing 3900 kg.

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले, काही भाविक गदा, धनुष्यबाण घेऊन येत असल्याची माहिती मिळाली आहे. आधी त्यांना कारसेवकपुरममध्ये ठेवण्यात येईल, त्यानंतर ते कुठे बसवायचे याचा निर्णय घेतला जाईल.

धनुष्यबाण आणि गदा याविषयी सांगताना सुमेरपूरचे कारागीर कैलाश सुथर सांगतात की, भगवान श्री रामाचा धनुष्य आणि हनुमानाची गदा बनवण्याचे काम त्यांच्या वास्तु आर्ट शिवगंज कंपनीला देण्यात आले होते.

त्यांच्या आणि त्यांचा साथीदार हितेश सोनी यांच्या देखरेखीखाली २० कारागिरांनी ७५ दिवस सतत काम केले. त्याच्या उभारणीसाठी भक्तांनी स्वत: आर्थिक मदत केली आहे. यामध्ये सुमारे ३५ ते ४० लाख रुपये जमा झाले.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »