khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

Recruitment in Post Offices : पोस्टात होणार बंपर भरती

 

 

भारतीय डाक विभाग अर्थात टपाल विभागाद्वारे मेगा भरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तब्बल ४०,००० पदांसाठी बंपर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ऑगस्ट महिन्यात या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही भारतीय डाक विभागाकडून प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर उमेदवार अर्ज करू शकतात.

The mega recruitment process will be implemented by the Indian Postal Department. A bumper recruitment process is going to be conducted for as many as 40,000 posts.

या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करू शकता. शिक्षण आणि वयाची अट नियमानुसार लागू असेल. १८ ते ४० वयोगटातील उमेदवार देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतील.

या भरती प्रक्रियेतून शाखा पोस्ट मास्टर्स, सहायक शाखा पोस्ट मास्टर्स, डाक सेवक ही पदे भरली जातील. या भरती प्रक्रियेसाठी १०वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. गुणवत्तेनुसारच उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेबद्दलचे सर्व अपडेट भारतीय डाक विभागाच्या वेबसाईटवर पहायला मिळतील.

निवेदन : सदरील नोकरी विषयक माहिती इच्छूकांना संधी मिळावी या हेतूने दिलेली आहे. पद भरती संबंधित अन्य कोणत्याही बाबीशी khabarbat.com तसेच या न्यूज पोर्टलच्या मुख्य संपादकांचा दुरान्वयाने देखील संबंध नाही, याची नोंद घ्यावी.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »