khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

IIT also faded : आयआयटीची चमक फिकी पडली!

 

Special Report

 

– ८,००० पेक्षाही अधिक आयआयटीयन्स बेरोजगार

– ३.६ ते ६ लाखांच्या पॅकेजची ऑफर

– गोल्ड मेडलिस्ट असूनही बेरोजगारीचा शिक्का

The glamor of IITs has also faded. More than 8000 IITians are unemployed, candidates who are trying for jobs, have to settle for a package of 3.6 to 6 lakhs.

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांत अनेक मोठ्या कंपन्यांनी कर्मचा-यांना कामावरून काढून टाकले आहे. TCS, Infosys सारख्या बड्या IT कंपन्यांमध्ये नोकरीचा वेग मंदावला आहे.

परिणामी IIT च्या ग्लॅमरची चमक देखील फिकी पडली आहे. सुमारे ८ हजार पेक्षाही अधिक आयआयटीयन्स बेरोजगार आहेत, जे उमेदवार नोकरीसाठी प्रयत्न करीत आहेत, त्यांना ३.६ ते ६ लाखाच्या पॅकेजवर समाधान मानावे लागत आहे.

आता परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, IIT सारख्या प्रतिष्ठित संस्थांनाही याचा फटका बसला आहे. मात्र सामान्य लोकांचा असा विश्वास आहे की, IIT मध्ये शिक्षण घेतल्याने मोठ्या पॅकेजसह उत्तम नोकरीची हमी देखील मिळते.

दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांपैकी फक्त काही हजार विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळते. दरवर्षी १० लाखांहून अधिक लोक ‘आयआयटी’ परीक्षेला बसतात, पण देशातील २३ ‘आयआयटी’ मध्ये फक्त १० हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो.

सीएनबीसी-18 च्या रिपोर्टनुसार, आता आयआयटी मधून पदवी घेतलेल्या लोकांनाही नोकरी शोधण्यात अडचणी येत आहेत.

२०२३-२४ च्या प्लेसमेंटमध्ये हजारो आयआयटीयन्सना विशेषत: काही जण ‘गोल्ड मेडलिस्ट’ असूनही नोक-या मिळू शकल्या नाहीत, असे या अहवालात एका RTI चा हवाला देऊन स्पष्ट करण्यात आले. अशा आयआयटीयन विद्यार्थ्यांची संख्या अंदाजे ८ हजार आहे.

२०२३-२४ मध्ये प्लेसमेंटसाठी नोंदणी केलेल्या एकूण आयआयटीयन्सपैकी ३८ टक्के हा आकडा किती चिंतेचा आहे, याचा अंदाज यावरून लावता येतो. २०२३ मध्ये प्लेसमेंटमध्ये नोक-या न मिळालेल्या आयआयटीयन्सची संख्या जवळपास दुप्पट आहे.

नोकरी मिळवण्यात अयशस्वी झालेल्या लोकांची संख्या खूप जास्त आहे, तर IIT चे विद्यार्थी ३.६ लाख ते ६ लाख रुपयांपर्यंतचे अत्यंत कमी पॅकेज स्वीकारत आहेत. ‘आयआयटी’साठी हे पॅकेज त्यामानाने खूपच कमी आहे.

आयआयटी कानपूरमधून शिक्षण घेतलेले आणि प्लेसमेंट मेंटॉर म्हणून काम करणारे धीरज सिंह यांचा हवाला देऊन ही आकडेवारी देण्यात आली आहे, ज्यांनी अनेक ‘आरटीआय’द्वारे ही आकडेवारी गोळा केली आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »