khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

Lets get govt. job : सरकारी नोकरी मिळवण्याचा शॉर्टकट

 

सरकारी नोकरी शोधणे हे अवघड काम असले तरी ते अशक्य नाही. सरकारी नोकरी शोधण्यासाठी विद्यार्थी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखती यासारख्या अनेक प्रक्रिया पार करतात. तथापि, यश मिळतेच असे नाही. मात्र तुम्हाला माहिती आहे का,  परीक्षा न देता सरकारी नोकरी मिळू शकते. त्यासाठी काही website ला भेट द्यायला हवी.

– सर्वप्रथम Mygov जॉब्स शोधा आणि Work at MyGov वर क्लिक करा.

– येथे तुम्हाला भारत सरकारने जारी केलेल्या Manager पासून Assistant पर्यंत पदांची यादी मिळेल, याच्या मदतीने तुम्ही तुमची पात्र – रिक्त जागा निवडू शकता.

– भारतीय न्यायालयांमध्ये Typist पदांसाठी अर्ज करता येतो. यासाठी लेखी परीक्षा नसते. टायपिंग टेस्ट आणि मुलाखत द्यावी लागते.

– यूपीएससीमध्ये नोकरीसाठी अर्ज करता येतो. या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा नाही.

– लेखी परीक्षेशिवाय नोकरी मिळविण्यासाठी आयटीआय apprentice पदासाठी अर्ज करता येतो. यामध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून join करू शकता.

– क्रीडा कोट्यातुनही परीक्षा न देता सरकारी नोकरी मिळण्याची संधी असते.

– संरक्षण मंत्रालयात अग्निशमन दलाच्या पदांवर भरतीसाठी अर्ज केले जाऊ शकतात. यंदा त्यासाठी 23 मे 2024 पर्यंत अर्ज करू शकता.

NITI आयोग

निती आयोगाच्या वेबसाइटवर रिक्त पदांच्या श्रेणीमध्ये अनेक पदे सापडतील, ज्यासाठी तुम्ही तुमच्या पात्रतेनुसार अर्ज करू शकता.

परीक्षा न देता NITI आयोगात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांना NITI आयोगाच्या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागेल.

NITI आयोगाच्या आवश्यकतेनुसार, उमेदवारांच्या प्रोफाइलची प्रारंभिक स्क्रीनिंग आणि शॉर्टलिस्ट केल्यानंतर, उमेदवारांना पुढील निवड प्रक्रियेसाठी बोलावले जाते.

तसेच , तुम्ही BECIL च्या अधिकृत वेबसाइटला देखील भेट देऊ शकता, येथे तुम्हाला AIIMS, मंत्रालय आणि IIM सारख्या सरकारी विभागांमध्ये अर्ज करण्यासाठी रिक्त जागा मिळतील.

Broadcast Engineering Consultants India Limited (BECIL) मध्ये परीक्षा न घेता सरकारी नोकरी मिळू शकते.

BECIL वर्षभर अनेक पदांसाठी उमेदवारांची भरती करते. त्यासाठी becil.com च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

निवेदन : सदरील नोकरी विषयक माहिती इच्छूकांना संधी मिळावी या हेतूने दिलेली आहे. पद भरती संबंधित अन्य कोणत्याही बाबीशी khabarbat.com तसेच या न्यूज पोर्टलच्या मुख्य संपादकांचा दुरान्वयाने देखील संबंध नाही, याची नोंद घ्यावी.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »