khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

Govt. Jobs : 10वी, 12वी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी

 

10वी आणि 12वी उत्तीर्ण उत्तीर्ण झाला असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर पुढील सरकारी नोकरीसाठी जरूर प्रयत्न करा. किंवा तुमच्या आजूबाजूला जर असे कुणी असतील तर त्यांनाही याबद्दल माहिती देऊ शकता.

RPF Constable Recruitment 2024

आरपीएफ म्हणजेच रेल्वे संरक्षण दलात 10वी पाससाठी 4208 कॉन्स्टेबलची भरती होत आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे आहे. आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीसाठी वयोमर्यादा 18 ते 28 वर्षे आहे. अनुसूचित जाती/जमातींना कमाल वयात 5 वर्षे सूट मिळेल आणि ओबीसी (नॉन क्रीमी लेयर) उमेदवारांना तीन वर्षांची सूट मिळेल. यासाठी (RRB) आरआरबीच्या वेबसाइट्सवर जाऊन अर्ज करावा लागेल. 

Air India Recruitment 2024

Air India Air Transport Services Limited (AIATSL) किंवा AI Airport Services Limited (AIASL) ने युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर आणि हँडीमॅन/हँडीवुमन या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. 10वी पास यासाठी अर्ज करू शकतात. ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे. अधिसूचनेनुसार, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर आणि हँडीमॅन/हँडीवुमनसाठी 422 जागा रिक्त आहेत. https://www.aiasl.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागेल.

निवेदन : सदरील नोकरी विषयक माहिती इच्छूकांना संधी मिळावी या हेतूने दिलेली आहे. पद भरती संबंधित कोणत्याही बाबीशी khabarbat.com तसेच या न्यूज पोर्टलच्या मुख्य संपादकांचा दुरान्वयाने देखील संबंध नाही. याची नोंद घ्यावी.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »