khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

Maharashtra Police : महाराष्ट्र राज्य पोलीस दलात सध्या बंपर भरती

महाराष्ट्र राज्य पोलीस दलात सध्या बंपर भरती सुरु आहे. या भरती अंतर्गत १७,४७१ विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलात हवालदार आणि ड्रायव्हर पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवाराने mahapolice.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज दाखल करावा. महत्त्वाचे म्हणजे या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदतही वाढवण्यात आली आहे. आता पोलीस भरतीसाठी तुम्हाला १५ एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे.

Maharashtra Police Bharti 2024 : महत्त्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया सुरु झाल्याची तारीख : ५ मार्च २०२४
अर्ज करण्याची अंतिम तारीख : १५ एप्रिल २०२४
रिक्त पदांची संख्या : १७,४७१

Maharashtra Police Bharti 2024 : रिक्त पदे पुढीलप्रमाणे
महाराष्ट्र राज्य पोलीस दलात पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई आणि बॅन्डसमन पदांवर भरती करण्यात येणार आहे.

Maharashtra Police Bharti 2024 : वयाची अट
महाराष्ट्र राज्य पोलीस दलात भरतीसाठी अर्ज दाखल करण्या-या उमेदवाराचे वय १८ ते २८ या दरम्यान असावे. मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्यात येईल. यासाठी इच्छुक उमेदवाराने अधिकृत अधिसूचना वाचावी.

Maharashtra Police Bharti 2024 : अर्जाची फी
महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला ४५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर मागासवर्गातील उमेदवाराला अर्ज शुल्कात १०० रुपये सूट मिळेल.

Maharashtra Police Bharti 2024 : शैक्षणिक पात्रता
महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवाराने बारावी उत्तीर्ण असणे किंवा त्या समकक्ष पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रात खालील जिल्ह्यात होणार पोलीस भरती :
बृहन्मुंबई, ठाणे, पिंपरी-चिंचवड, मिरा-भाईंदर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, अमरावती, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, लोहमार्ग-मुंबई, ठाणे ग्रामीण, रायगड, पालघर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, नाशिक ग्रामीण, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सातारा, सांगली, सोलापूर ग्रामीण, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, लातूर, परभणी, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, लोहमार्ग-पुणे, लोहमार्ग औरंगाबाद.

निवेदन : सदरील नोकरी विषयक माहिती इच्छूकांना संधी मिळावी या हेतूने दिलेली आहे. पद भरती संबंधित अन्य कोणत्याही बाबीशी khabarbat.com तसेच या न्यूज पोर्टलच्या मुख्य संपादकांचा दुरान्वयाने देखील संबंध नाही. याची नोंद घ्यावी.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »