khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

Job : दहावी उत्तीर्णांसाठी रेल्वेत नोकरी, १,६४६ पदांसाठी भरती

रेल्वेने १,६४६ पदांसाठी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. उमेदवार १० फेब्रुवारी २०२४ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

अधिकृत वेबसाइट rrcjapur.in द्वारे अर्जाचा फॉर्म सबमिट करावा लागेल. ही भरती प्रकिया उत्तर-पश्चिम रेल्वेने शिकाऊ पदांसाठी राबवली आहे.

अर्ज करणा-या उमेदवारांना ५० टक्के गुणांसह १० वी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. याशिवाय, संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पदवी असणे आवश्यक आहे. आयटीआय पदवी नसलेले तरुण अर्ज करण्यास पात्र नाहीत.

वयोमर्यादा

अर्जदाराचे वय १५ ते २४ वर्षे दरम्यान असावे. एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

असा करावा अर्ज…

– अधिकृत वेबसाइट rrcjapur.in वर जा.

– येथे Recruitment सेक्शनमध्ये जा.

– आता Apprentice Recruitment Notification वर क्लिक करा.

– यानंतर मार्गदर्शक तत्त्वे वाचा आणि अर्ज करा.

– फी भरा आणि सबमिट करा.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like