khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत जालन्याची मनस्वी दांडगे सर्वप्रथम

जालना :  पुणे येथे नुकतेच १३ वी नॅशनल आणि सहावी आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत देशभरातील विविध राज्यामधील स्मार्ट किडच्या शाखेतील ३,५०० पेक्षाही अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यामधून जालन्याच्या मनस्वी दांडगे या विद्यार्थिनीने B2 कॅटेगिरीतून प्रथम क्रमांक पटकवला आहे.

Manswi Dandge
International Abacus Compitition winner Manswi Dandge

यानिमित्त तिचा स्मार्ट किड्स अबॅकस अकॅडमीच्या मुख्य संचालिका सौ. प्राजक्ता संजय कळमकर यांनी तिचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरव केला .

तसेच या स्पर्धेमध्ये आर्यन शेळके , सानिध्य कांबळे, त्रिशा सोनार, विराज दांडगे, नैतिक गडवे, अथर्व गिरी, सार्थक गिरी, तसेच तृप्ती गिरी व श्रुती गिरी यांनी देखील पुणे येथे अबॅकस स्पर्धेत सहभाग घेऊन विशेष ट्रॉफी व प्रमाणपत्र मिळवले आहे. या सर्वाना जालना स्मार्ट किड्स अबॅकस अकॅडमीच्या संचालिका सौ जयश्री बुट्टे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »